Viral Video:तीन महिलाच्या मद्यधुंद अवस्थेत भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा, कॅमेरात व्हिडिओ केला शूट, पोलिसांना केली शिवीगाळ.

Spread the love

Viral Video: उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. तीन महिला मद्यधुंद अवस्थेत असताना पोलिसांशी भर रस्त्यात हुज्जत घालत असल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

महिलांनी शिवीगाळ केल्यानंतर पोलिसांनी व्हिडीओ शूट केला. त्यानंतर त्या महिलांनी पोलिसांसोबत वादविवाद करण्यास सुरुवात केली. महिला पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचेपर्यंत त्या महिलेचा हाय वोल्टेज ड्रामा भर रस्त्यात सुरुच होता. हा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिलेनं भर रस्त्यात राडा घातल्याने पोलिसांनी तिचं हे कृत्य कॅमेरात शूट केलं. परंतु, त्या महिलेनं पोलिसांचा फोन हिसकावून जमिनीवर आपटल्याची माहिती समोर आलीय. महिलेनं रस्त्यावर धिंगाणा घातल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची व्हिडीओत दिसत आहे. या महिलांनी दारु पिऊन रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा केल्याचं समजते आहे.

रिपोर्टनुसार, महिलांनी पोलिसांशी भांडण करून त्यांना अश्लील भाषेत सुनावलं. हा संपूर्ण प्रकार घडत असताना महिला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्या महिलेला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी या महिलेची वैद्यकीय चाचणी केली. त्यावेळी त्या महिलेनं मद्यपान केल्याचं समोर आलं.

त्यानंतर त्या महिलेच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनला बोलावून तिला घरी नेण्यास सांगण्यात आलं. दारु पिऊन भर रस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या लोकांचा व्हिडीओ पुन्हा एकदा समोर आल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

हे पण वाचा


टीम झुंजार