रायगड :- सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने झोडपले आहे अश्यातच रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याने आतापर्यंत चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर एनडीआरएफची दोन पथकं बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली. याशिवाय मुंबईहून आणि पनवेलहूनही तीन बचाव पथकं इर्शाळवाडीत दाखल झाली. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळावर पोहचले असून त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला. तसेच याबाबत माध्यमांना माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..
“दरड कोसळल्याने लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आतापर्यंत चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ व स्थानिक मदत पथक काम करत आहे. मदतकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तयार आहेत. मात्र, वातावरण खराब असल्याने हेलिकॉप्टर उड्डान करू शकत नाही.”
“मी स्वतः हवाईदलाशी बोलत आहे”
“मी स्वतः हवाईदलाशी बोलत आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. ज्या माध्यमांचा वापर करता येईल त्या त्या माध्यमांचा वापर करून मदत केली जाईल. जनावरंही मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. काही वेळापूर्वीच एनडीआरएफच्या जवानांनी एका जनावराला जीवंत बाहेर काढलं. एका मुलीलाही जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे घटनेची पाहणी करण्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. दरम्यान, बचाव पथकांनी आतापर्यंत २२ जणांची सुखरूप सुटका केली आहे. अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे १०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी बचाव कार्यात गुंतले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. यासह बचावकार्यात एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
पहा व्हिडिओ :
इर्शाळवाडी हे एक छोटंसं गाव असून त्या गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला असून त्यात अनेक गावकरी माती-खडकांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल (बुधवार, १९ जुलै) रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
पायाखाली पक्का रस्ता नाही, वरून पावसाला खंड नाही… रायगड दरड दुर्घटनेत बचाव पथकांसमोर आव्हानांचा ‘डोंगर’!
इर्शाळवाडीत सुरू असलेल्या बचावकार्यात अनेक अडचणी येत आहे. हे गाव डोंगराच्या पायथ्यापासून उंचीवर आहे. गावापर्यंत पोहोचायला चांगला रस्ता नसल्यामुळे तिथे जेसीबीसारखी वाहनं आणि मोठी यंत्रसामग्री नेता येत नाहीये. त्यामुळे लहान-मोठी अवजारं वापरून बचावपथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. एनडीआरएफच्या जवानांसह बचावपथकांना नेहमीची कुदळ आणि फावडं यांसारख्या लहान-मोठ्या अवजारांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसावा लागतोय
हे वाचलंत का ?
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!