मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : निफ्टी ५० ने गुरुवारच्या सत्रात विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांक दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ व्यवहार करत होते. साप्ताहिक एक्स्पायरीच्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात विक्रमी वाढ सुरूच होती. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टीने गुरुवारी इंट्राडेमध्ये नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. गुरुवारी, सेन्सेक्स ४७४.४६ (०.७१%) अंकांच्या वाढीसह ६७,५७१.९० वर बंद झाला, तर दुसरीकडे निफ्टी १४६.०० (०.७४%) अंकांनी चढून १९,९७९.१५ वर बंद झाला. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी निफ्टी पहिल्यांदा २०,००० च्या जवळ पोहोचला. निफ्टी निर्देशांक इंट्राडेमध्ये १९,९९१ चा स्तर गाठण्यात यशस्वी ठरला.
सेन्सेक्स समभागांमध्ये आयटीसी, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँकेने प्रत्येकी दोन टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. मारुती, एअरटेल, एसबीआय, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅक्सिस बँक यांचे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले. दुसरीकडे, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक आणि बजाज फिनसर्व्ह तोट्यासह बंद झाले. इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या विलगीकरणानंतर किमतीत १.२ टक्क्यांनी वाढ झाली. रिलायन्सचा शेअर गुरुवारी १.१९% वाढून २,६१९.८० रुपयांवर बंद झाला. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर्स २६१.८५ रुपयांवर ट्रेडिंग करताना दिसले, जे प्रति शेअर १६०-१९० रुपयांच्या बाजार अंदाजापेक्षा जास्त आहे.
क्षेत्रानुसार, निफ्टी एफएमसीजी १.३५% आणि निफ्टी बँक १.१३% वाढले. तर निफ्टी आयटी ०.६६% घसरून बंद झाला. इन्फोसिसच्या जून तिमाही निकालापूर्वी आयटी शेअर्स २.२ टक्क्यांनी घसरले.
जागतिक बाजारातून मिळालेले भक्कम संकेत, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केल्याने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास यामुळे एनएसईचा प्रमुख निर्देशांक केवळ १५ ट्रेडिंग सत्रांमध्ये ९०० अंकांपेक्षा जास्त वाढला आहे. २८ जून रोजी निफ्टी १९,००० च्या पातळीवर व्यवहार करत होता.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.