पाचोरा :- तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर बनावट देशी दारूची वाहतूक करत असलेल्या इसमांवर राज्य उत्पादन शुल्कच्या जळगाव जिल्ह्याच्या भरारी पथकाने कारवाई करून ५ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यानुसार संशयित तीन आरोपींवर अटकेची कारवाई करून राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी १९ रोजी दुपारी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर त्यांनी सापळा रचला असता, तिथे बनावट देशी दारू वाहतूक करताना संशयित आरोपी अविनाश संतोष जाधव (वय – २४ वर्ष) रा. हिंगणे ता. जामनेर) आणि रेहान रमजान मन्यार (वय – २० वर्ष) रा. नेरी दिगर ता. जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून बनावट देशी दारू टँगो पंचच्या १८० मि.ली. असलेल्या एकूण ९८४ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बऱ्याच दिवसापासून अवैध बनावट मद्याची सदर परिसरात वाहतूक होत असल्याची माहिती दारूबंदी विभागाचे अधिकारी पाटील यांना होती. यामध्ये योग्य वेळी सापळा रचून भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. सदर बनावट मद्य पुरविणारा महेन्द्र शामलाल राजपूत रा. तळेगाव ता. जामनेर यास देखील संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील वापरलेली चार चाकी वाहन (एम. एच. २७ बी. झेड. ५७०६) ही देखील जप्त करण्यात आली आहे.
एकूण ५ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. तिघही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी. एच. पाटील, दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी, गोकुळ कंखरे, रघुनाथ सोनवणे, प्रतिकेश भामरे, मनोज मोहिते, विठ्ठल हटकर यांनी केली आहे. कारवाईसाठी चाळीसगावचे आर.जे. पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकेश पाटील, गिरीश पाटील यांनी मदत केली. घटनेचा पुढील तपास वाय. वाय. सूर्यवंशी हे करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






