धक्कादायक घटना! मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल,देशात संतापाची लाट एका आरोपीस अटक.

Spread the love

मणिपूर :- मध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पोलीस म्हणाले, “या प्रकरणाचा.”
मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला.

मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं. पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी या व्हायरल व्हिडीओबाबत निवेदन जारी केलं. ते म्हणाले, “दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

“या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य पोलीस दल आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे,” असंही पोलिसांनी नमूद केलं.
धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. लक्षणीय बाब म्हणजे महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली असून हेरोदास मेईतेई असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीस अटक…….
वृत्तसंस्थान एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुख्य आरोपी ज्याने हिरवा टी-शर्ट घातलेला होता त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने नग्न महिलेला पकडून ठेवले होते. त्याला आज सकाळी ओळख पटल्यानंतर एका कारवाईत अटक करण्यात आली. आरोपीचे नाव हुइरेम हेरोदास मेईतेई (३२) असे आहे. अशी माहिकी सरकारी सूत्रांनी दिली आहे.

मणिपूरमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना”…..

मणिपूर पोलिसांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेची माहिती देताना सांगितलं, “मागील २४ तासात राज्यातील स्थिती शांततापूर्ण आहे. मात्र, काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडत आहेत. राज्य सरकार आणि केंद्रीय दलाकडून शोध मोहिम सुरू आहे. इंफाळमध्ये दोन शस्त्रास्त्रांसह दोन मॅगेझिन जप्त करण्यात आले आहेत.”

“५ जिल्ह्यांमधील जमावबंदीची शिथिलता हटवली”

“५ जिल्ह्यांमधील जमावबंदीबाबतची शिथिलता काढण्यात आली असून तेथे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी हिंसाचारात सहभागी झालेल्या ४५२ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे,” अशी माहिती मणिपूर पोलिसांनी दिली.

हे पण वाचा



टीम झुंजार