Viral Videoभोपाळ : रस्त्यात मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला त्याच पोलिसानं चांगलाच हिसका दाखवला. भर रस्त्यात या तरुणाला चांगला चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण भर रस्त्यात एका मुलीला छेडछाड करत असताना तिथून जाणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलनं त्याला टोकण्याचा प्रयत्न केला. पण या तरुणानं त्या पोलिसावरच दादागिरी सुरु केली. त्यानंतर पोलीस आणि छेडछाड करणाऱ्या तरुणामध्ये झटापट सुरु झाली.
दरम्यान, हाच उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाची पोलिसानं चांगलीच धुलाई केली. भर दिवसा रस्त्याच्या कडेला बराच वेळ त्यांच्यात ही झटापट सुरु होती. या घटनेचं तिथंच असलेल्या एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये चित्रिकरण केलं. हाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आरोपीचे नाव अजय प्रताप सिंह बघेल असे आहे. तो काँग्रेस पक्षाचा झोपडपट्टी विभागाचा उपाध्यक्ष आहे. सांगितले जात आहे की, तो तरुणीशी कथीतरित्या छेडछाड करत होता.
दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हा प्रकार निदर्शनास आला.त्याने जाब विचारला असता आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने पोलीस कर्मचाऱ्यावर हात उगारला. त्यामुळे मग पोलिसांनी त्याची चांगलीच धुलाई केली.
आरोपी विरोधात सिव्हील लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याच्यावर भादंसं कलम 353, 332, 186, 294, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक झाली आहे. (हेही वाचा, विग लावून दुसरे लग्न करण्यास पोहचला नवरा, बिंग फुटताच मुलीच्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली.
हे पण वाचा
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!