Lost your sense of taste or smell? 3 tips for eating well ताप येऊन गेला की तोंडाला चवच नसते, अन्न बेचव लागते, काही खावेसे वाटत नाही, अशावेळी काय करावे?
”आजारी पडल्यानंतर तोंडाची चवच गेलीय गं, काहीच खाऊ वाटत नाही.” असं तुमच्यासोबत देखील घडलं असेल. तब्येत ठीक झाल्यानंतरही काही दिवस तोंडाची चव बिघडते. काहीही खाल्ल्यानंतर पदार्थाची चव बेचव लागते. हे आजारपणात असताना किंवा ताप आल्यानंतर अशी स्थिती निर्माण होते.
अशा स्थितीत अनेकदा जेवण देखील जात नाही. बहुतांश वेळा पाणी देखील कडू लागते. बेचव अन्न लागते म्हणून आपण खाणे टाळतो. यामुळे शरीरात अशक्तपणा येण्याची शक्यता वाढते. अशावेळी तोंडाची चव बिघडल्यावर काय खावे याची माहिती, पोषणतज्ज्ञ सरिता खुराना यांनी शेअर केली आहे.
न्यूट्रिशनिस्ट सरिता म्हणतात, ”तापामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्मची गती बिघडते. जोपर्यंत चयापचय व्यवस्थित होत नाही तोपर्यंत कोणत्याही पदार्थाची चव बेचव लागणार.” अशा स्थितीत काय खावे, काय टाळावे याची माहिती त्यांनी दिली आहे.
नारळ पाणी.

तोंडाची चव बिघडली असेल तर, सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्या. यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर आढळते. नारळ पाणी पोटासाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. पोषणतज्ज्ञ म्हणतात, ‘नारळाच्या पाण्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म रेट सुधारण्यासही मदत होते.’
लिंबूपाणी.

लिंबू पाणी प्यायल्याने तोंडाची चव सुधारते. परंतु, लिंबू पाण्यात साखरे ऐवजी मधाचा वापर करावा. सरिता यांच्या म्हणण्यानुसार, ”’लिंबू पाण्यात व्हिटॅमिन-सी योग्य प्रमाणात असते. यामुळे शरीराला प्रतिकारशक्ती मिळते. यासह मेटाबॉलिक रेटही सुधारतो. दिवसातून एक ग्लास लिंबू पाणी प्या, यामुळे पोटही साफ राहते.”
नैसर्गिक अन्न खा.

पोषणतज्ज्ञ म्हणतात, ”जोपर्यंत तब्येत ठीक होत नाही, तोपर्यंत नैसर्गिक अन्न खा. पॅकेज फूड ऐवजी घरात तयार होणारे पदार्थ खा. यासह फळे नियमित खा. आहारात किवी व सफरचंदाचा समावेश करा. मुख्य म्हणजे व्हिटॅमिन-सी युक्त फळे तोंडाची चव सुधारण्यासाठी मदत करू शकतात.
काय खाऊ नये.

तापामुळे तोंडातील चव बिघडली असेल, तर तज्ज्ञ केळी आणि पेरू न खाण्याचा सल्ला देतात. यासह डेअरी प्रॉडक्ट्स आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.