मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इ. स. १८९७ साली लिहिलेले श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांचे स्वामीभक्त कै. गणेश बल्लाळ मुळेकर यांनी लिहिलेले मूळ चरित्र आता त्यांच्या भक्तांसाठी तसेच वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ यांच्या सान्निध्यात राहून दैनंदिन घटनांची टाचणे करून त्याच्या आधारे लिहिलेली ही बखर आता त्यांचे पणतू प्रशांत केशव मुळेकर यांनी १२ व्या आवृत्तीच्या रुपाने प्रकाशित केले आहे.
हे चरित्र म्हणजे स्वामी भक्तांसाठी ठेवा आहे. कारण ते उपलब्ध होत नसल्यामुळे अखेर प्रशांत मुळेकर यांनी पुढाकार घेतला आणि त्याचे प्रकाशन केले आहे. स्वामी समर्थ यांच्या मुखातून आलेली अध्यात्म, धर्म, जीवन, भक्ति, शास्त्र, व्यवहार वगैरे संबंधीची बोधवचने तसेच महाराजांविषयीची माहिती ठिकठिकाणांहून संकलित करून त्यांनी १८९७ साली हे चरित्र (बखर) लिहिले आहे. त्या काळातील वृत्तपत्रांमधील बातम्यांचाही आधार घेतला आहे.
या अक्कलकोट येथील स्वामींचे वास्तव्य, अनुभविक माहिती, स्वामीभक्त चोळाप्पा, बाळाप्पा आणि श्रीस्वामीभक्तपरायण स्वामीसुत, आनंदनाथ महाराज, तातमहाराज, दादरचे श्री बाळकृष्ण महाराज आदींचीही माहिती आहे. सदाशिव नारायण भट यांच्याकडील संकलनदेखील यात आहे. हे पुस्तक सध्या एमॅझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा या ऑनलाईन स्टोअरवरील उपलब्ध आहेच शिवाय इच्छुकांना अधिक माहितीसाठी प्रशांत मुळेकर यांच्याशी ९८६७७९९९१५, ७०२१२८६००७ वर संपर्क साधता येईल.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन