झुंजार विशेष प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) :- श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर येथील तालुका ,जिल्हा , राज्य आणि राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध अंतरराष्ट्रीय कलाकार माननीय . अतुल अभिमन्यू गायकवाड सर यांचे विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलांना वाव देण्यासाठी सतत विविध उपक्रम चालू असतात.
यामध्ये प्रामुख्याने सरांचे फलक लेखन खास एक वैशिष्ट्य आहे विद्यालयात येताच जणू स्वागतासाठी त्यांच्या फलक लेखन आणि पेंटिंग मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे ,शिक्षकांचे आणि पालकांचे स्वागतच होत असते .यामध्ये प्रामुख्याने थोरा मोठ्यांच्या जयंती , पुण्यतिथी , सण,उत्सव ,कला ,क्रीडा जगतातील चालू घडामोडी , इको फ्रेंडली गणपती तयार करणे ,आकाश कंदील बनवणे ,कागदी पिशव्या बनवणे , आर्टक्राफ्ट्स बनवणे ,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे आणि सर्वात महत्वाचे सरांचे विद्यार्थी आता स्वतः फलक लेखन करू लागले आहेत
आणि कलेमार्फत स्वयंरोजगार पण आपण चालू करू शकतो हे आता विद्यार्थ्यांना समजू लागले आहेत . ते आता मोठ्या उत्साहाने अतुल सरांचे अनुकरण करतात.
आणि असाच एक अनोखा आगळा वेगळा उपक्रम मुलांना घेऊन शाळेतील झाडांच्या बुंध्यांना रंगविणे …या उपक्रमाने विश्वविक्रम केला आहे .जागतिक स्तरावरील “WORLD WIDE BOOK OF RECORD ” मध्ये अतुल सरांची नोंद झालेली आहे . श्री वर्धमान विद्यालयाच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मिळवला आहे . त्याबद्दल सगळीकडून अतुल सरांचे आणि विद्यालयाचे भरभरून कौतुक होत आहे .
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.