जळगाव :- शहरातून चोरलेली दुचाकी धुळ्यात, नंदुरबार येथून चोरलेली जळगावात विक्री करून अनेक वर्षांपासून गुंगारा देणारा अट्टल गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांच्या हाती लागला आहे.
जळगाव शहरात चोरीची दुचाकी विक्री करताना भामट्याला अटक केली. त्याने ११ दुचाकी काढून दिल्या. गोपाळ भाईदास शिरसाठ (वय २३, मूळ रा. पिळोदा, ता. शिरपूर जि. धुळे, ह.मु. बेस्तान, जि. सुरत) असे चोरट्याचे नाव आहे.
दुचाकी चोरटा गोपाळ भाईदास शिरसाठ मास्टर चावीने दुचाकींची चोरी करुन त्याची विक्री दुसऱ्या जिल्ह्यात करीत होता. गोपाळ शिरसाठ अजिंठा चौफुली परिसरात दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यावरून सापळा रचून पोलिसांनी गोपाळ शिरसाठ याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने आपण जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या ११ विनाक्रमांकाच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
गोपाळ याने एमआयडीसी हद्दीतून २, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १, अमळनेर येथून २, शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३, देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १, दोंडाईचा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १, नंदुरबार पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १, अशा दहा दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध याठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, विकास सातदिवे, किशोर पाटील, स्वप्नील पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, ईश्र्वर भालेराव, इम्तियाज खान यांनी ही कारवाई केली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.