जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेऊ नका. जुने ताण संपतील. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनातील मधुरता वाढेल. दिवस बर्यापैकी अनुकूल राहील.
वृषभ :-
वाढीव कामातून लाभ मिळेल. कामात युक्ती वापरावी लागेल. आजच दिवस व्यस्त राहील. नोकरदारांनी बदलांकडे लक्ष ठेवावे. जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल.
मिथुन :-
तांत्रिक कामात यश येईल. कामे जलद गतीने पार पडतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात याल. दिवसाची सुरुवात उत्तम होईल.
कर्क :-
गरज लक्षात घेऊन काम करावे. घाईने निर्णय घेऊ नका. मेहनतीला मागे हटू नका. आत्ममग्न राहाल. वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या.
सिंह :-
हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे. चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. मोहाला बळी पडू नका. अनावश्यक चिंतेला दूर सारावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.
कन्या :-
एकमेकांत तुलना करू नका. मुलांशी हितगुज कराल. घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
तूळ :-
साहसी कामे करतांना सावध राहावे. पोटाची तक्रार जाणवेल. कामानिमित्त प्रवास घडेल. दिवस धावपळीत जाईल. समस्यांचे निराकरण न झाल्याने मन खट्टू होईल.
वृश्चिक :-
योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मनातील नकार काढून टाका. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. मुलांचा विरोध जाणवू शकतो. वडीलधार्यांचा सल्ला घ्यावा.
धनू :-
कामाचा ताण हलका होईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. जुनी येणी वसूल होतील.
मकर :-
त्वचा विकारांकडे लक्ष ठेवा. अति भावनिक होऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. खर्च वाढू शकतो. प्रवासात निष्काळजीपणा करू नका.
कुंभ :-
शाब्दिक चकमक टाळावी. कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्या. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. प्रेमातील जवळीकीत सावध रहा. मनातील इच्छा पूर्ण होईल.
मीन :-
दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. मुद्दलावर ध्यान द्यायला हवे. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. यशाने उत्साह वाढीस लागेल. उत्तम संधीने मन प्रसन्न होईल.
हेही वाचलंत का ?
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.
- धुमधडाक्यात आली वरात, डी जे वाजवण्यावरून झाला वाद, लग्नाचा आनंद क्षणात दुःखाच्या सागरात बुडाला, लग्नात असं काय घडलं?