निंभोरा जि प कन्या शाळेत गणवेश वाटप

Spread the love

निंभोरा ता रावेर प्रतिनिधी / परमानंद शेलोडे.


रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथे नुकताच विद्यार्थीनीना गणवेश वाटपाचा छोटेखानी कार्यक्रम कन्या शाळेत घेण्यात आला या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मीनाक्षी महाले व सदस्य तसेच गावातील मान्यवराना शाळेत गणवेश वाटप करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते .

कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्यध्यापक हेमंत चौधरी यांनी प्रमुख पाहुण्या चे स्वागत केले नंतर मान्यवराच्या हस्ते विद्यार्थीनी ना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेलोडे भागवत ठाकरे गुरुजी ग्रामपंचायत सदस्य शेख दिलशाद सर यांनी गणवेश वाटप करतांना आपल्या मनोगतातून विद्यार्थीनी च कौतुक केले.

तसेच नवीन रुजू झालेल्या शिक्षिका यांचे पण मनोगतातून शब्द सुमणांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्यध्यापक चौधरी यांनी केले कार्यक्रमाला शा समिती अध्यक्ष मीनाक्षी महाले उपाध्यक्ष असलम खान सदस्य मनीषा पाटील सुमंगला वाघ ग्रामपंचायत सदस्य शेख दिलशाद सर शिक्षक प्रतिनिधी भागवत ठाकरे गुरुजी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेलोडे शिक्षिका हेमलता पाटील पल्लवी राणे यांच्या सह वर्गातील विद्यार्थीनी ची उपस्थिती होती.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार