मणिपूरची पुनरावृत्ती बंगालमध्ये! पंचायत निवडणुकीतीत महिला उमेदवाराची टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी महिलेची काढली नग्न करुन धिंड.

Spread the love

कोलकाता : मणिपूरमध्ये महिलांच्या नग्न परेडचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पश्चिम बंगालमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. पंचायत निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) गुंडांनी एका महिला उमेदवाराला विवस्त्र करून गावभर परेड केल्याचा आरोप आहे. एएनआयच्या वृत्तानुसार महिला उमेदवाराला मारहाण करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना ८ जुलै २०२३ ची आहे. जागरणच्या वृत्तानुसार, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एका महिला उमेदवाराने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर विनयभंग आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

८ जुलै रोजी महिला उमेदवाराची संपूर्ण गावात नग्न परेड करण्यात आली होती. घटना हावडा जिल्ह्यातील पांचला भागातील आहे. याप्रकरणी पाचला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये टीएमसी उमेदवार हेमंत राय, नूर आलम, अल्फी एसके, रणबीर पंजा संजू, सुकमल पंजा यांच्यासह अनेकांची नावे आहेत.

सुमारे ४० ते ५० टीएमसीच्या गुंडांनी तिच्यावर हल्ला केल्याचे महिलेने सांगितले आहे. तिच्या छातीवर आणि डोक्यावर काठीने हल्ला करण्यात आला. तिला मतदान केंद्राबाहेर फेकण्यात आले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे रिपब्लिकच्या वृत्तात म्हटले आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा टीएमसीचे काही कार्यकर्ते तिच्याशी छेडछाड करत होते, तेव्हा त्यांच्या एका नेत्याने त्यांना कपडे फाडण्यास प्रवृत्त केले.

बंगाल भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, भाजपने दबाव निर्माण केल्यावर या प्रकरणातील एफआयआर नोंदवण्यात आला होता. ते म्हणाले, ‘ममता बॅनर्जी तुम्हाला लाज वाटत नाही का? ८ जुलै २०२३ रोजी, पंचायत निवडणुकीच्या दिवशी, तुमच्या सचिवालयापासून थोड्या अंतरावर असलेल्या हावडा येथील पंचला येथे ग्रामसभेच्या एका महिला उमेदवाराला मारहाण करण्यात आली, नग्नावस्थेत परेड करण्यात आली. भाजपने दबाव आणल्यावर तुमच्या पोलिसांनी एफआयआर नोंदवला.

हे पण वाचा

टीम झुंजार