एरंडोलला नवीन वसाहती मधील चिखलाच्या साम्राज्यामुळे नागरिकांना झाली डोकेदुखी.नगरपालिका प्रशासनाने दखल घेण्याची नागरिकांची मागणी.

Spread the love

एरंडोल :- येथे शहरालगत असलेल्या नगरपालिका हद्दीतील नवीन वसाहतींमध्ये सध्या सर्वत्र रस्त्यावर झालेल्या चिखल व गाऱ्याच्या साम्राज्यामुळे परिसरातील रहिवाशांना दैनंदिन रहदारी करणे मोठी डोकेदुखी झाली असून या कामी नगरपालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी रहिवाशांतर्फे करण्यात आली आहे.

येथे जुन्या धरणगाव रस्त्यालगत असलेल्या इंद्रप्रस्थ नगर, गुरुकुल कॉलनी, , आनंद नगर, साई पार्क, वनाई नगर, आदी भागांमध्ये पावसामुळे मातीच्या कच्च्या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचल्यामुळे सर्वत्र चिखल व गाऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांना, पायी चालताना, शाळेत मुलांना पोचविताना तसेच दैनंदिन रहदारी करताना, दुचाकी, चार चाकी धारकांना, महिला वर्गास, मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे

रस्त्यावर झालेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे परिसरात डास मच्छरांचे प्रमाण देखील वाढले आहे नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर झालेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये मुरूम, कच, टाकून खड्डे बुजवावे अशी अपेक्षा नागरिकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार