जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
सामाजिक भान राखून वागाल. आरोग्यात सुधारणा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी ताळमेळ साधाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
वृषभ :-
परनिंदा चांगली नाही. वाहन जपून चालवा. व्यवहारात पारदर्शकता हवी. घरातील जबाबदारी पार पाडाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल.
मिथुन :-
समोरच्या व्यक्तीला जाणून घ्या. आर्थिक गणित जमेल. अगोचरपणा करून चालणार नाही. टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील. मनातील प्रेमभावना वाढीस लागेल.
कर्क :-
अविश्वास दाखवू नका. अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका. साहस करताना सारासार विचार करावा. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे.
सिंह :-
मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. वादाच्या मुद्यात जिंकाल. दिवस अनुकूल जाईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.
कन्या :-
काही चांगल्या बातम्या कानावर येतील. अधिकारी वर्ग खुश राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल. जुनी कामे मार्गी लागतील. अति जोखीम पत्करू नका
तूळ :-
नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. भावंडांना मदत करावी लागेल. उधारी चुकती कराल. मानसिक चिंता वाढू शकते.
वृश्चिक :-
झालेली चूक कबूल करावी लागेल. अति हुरळून जाऊ नये. आपले मत इतरांवर लादू नका. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
धनू :-
ठाम निर्णय घ्यावेत. अति भावनाविवश होऊ नका. कामे थांबू नयेत याची काळजी घ्या. ज्येष्ठांशी वाद टाळावेत. कलाक्षेत्रात प्रशंसा होईल.
मकर :-
नसत्या फंदात पडू नका. कामे संथ गतीने पार पडतील. कामात उत्साह जाणवेल. मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे. नवीन वलय प्राप्त होईल.
कुंभ :-
भावनेला आवर घालावा लागेल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. भडक शब्द वापरणे टाळावे. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. मानसिक शांतता जपावी.
मीन :-
मौलिक सल्ला घ्यावा लागेल. कामाचा वेळ वाढवावा लागेल. स्वत:च्याच विश्वात रमून जाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.
हेही वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.