एरंडोल | प्रतिनिधी :- येथे सकल जैन समाजातर्फे जैन मुनीश्री ची निघृण हत्या केल्याप्रकरणी एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
सकल जैन समाज तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्नाटक राज्यातील हिरकुंडी येथे काही समाजकंटकांनी जैन मुनिश्री कामकुमार नंदी यांची निघृण हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करून ट्यूबवेल मध्ये फेकले आहेत तसेच भारतात जैन मंदिरावर होत असलेल्या अवैध कब्जे जैन मुनीश्री चे होत असलेले अपघात यांच्याविरुद्ध सकल जैन समाज एरंडोल तर्फे सर्व समाज बांधवांचे दुकाने बंद करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
तरी जैन मुनीश्रीची हत्या करणाऱ्या लवकर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे जैन समाज करीत आहे या निवेदनावर एडवोकेट ए एम काळे, जितेंद्र जैन, चंदन काळे, अशोक जैन सुरेश जैन, ऋषभ जैन सौ हर्षदा काळे, जयश्री काळे, प्राजक्ता काळे, प्रमोद जैन सीमा जैन, सचिन जैन प्रीती जैन, पूनम जैन, वैशाली जैन, कविता जैन, अमोल जैन उज्वल जैन शुभम जैन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.