नागपूर :- ऑनलाईन गेमच्या माध्यमातून नागपुरातील उद्योग पतीच्या मुलाची गोंदियातील तरुणाने 58 कोटी रुपयाने फसवणूक केली. तो फसवणूक करणारा आरोपी गोंदियातील असल्याने नागपूर पोलिसांनी गोंदिया पोलिसांच्या मदतीने त्याच्या घरावर धाड टाकली. आरोपी अंनत नवरतन जैन याच्या घरातून 15 कोटी रूपये रोख रक्कम, 5 किलो सोन्याचे बिस्कीट व 200 किलो चांदची आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. हे 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजतापासून सायंकाळी 7 वाजतापर्यंत केलेल्या चौकशीत पुढे आले. पोलिसांची चौकशी सुरूच होती.
गोंदिया शहराच्या सिव्हील लाईन भागातील काका चौकात जैन यांचे घर आहे. अंनत नवरतन जैन यांचे गोंदिया शहराच्या मुख्य बाजार पेठेत कुर्त्याचे दुकान आहे. त्यांना गोंदियात कुर्तेवाला म्हणून ओळखले जाते. मात्र कुर्ते व्यापाराच्या आड त्यांचा मुलगा अनंत हा ऑनलाईन गेमिंग खेळवित असे. नागपुरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या मुलगा हा ऑनलाईन गेम खेळताना गोंदियातील अंनत जैन यांच्या संपर्कात आला. अनंतने त्याची 2021 ते 2023 या काळात 58 कोटी ४2 लाख रुपयाने फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे त्या नागपूरच्या तरूणाच्या लक्षात आल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.. नागपूर पोलिसात अनंत जैन याच्या विरोधात तक्रार करताच नागपूर पोलिसांनी गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने 21 जुलै रोजी धाड घातली. आरोपी अनंत नवरतन जैन याच्या घरातून 15 कोटी रूपये रोख रक्कम, 5 किलो वजनाचे सोन्याचे बिस्कीट व 200 किलो चांदी जप्त केली आहे. कारवाई सुरूच असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हे पण वाचा
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.