सातपुड्यात निसर्ग सौंदर्य पाऊस आणि पर्यटकांची गर्दी

Spread the love

सावदा/प्रतिनिधी ( प्रशांत सरवदे ) सातपुडा पर्वतरांगांमध्ये पावसाची संततधार चालूच आहे. शनिवारी सातपुडा पर्वतरांगांमध्ये 70 मिलिलीटर पावसाची नोंद करण्यात आली. रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये असणारे सर्वच धरणे ओसंडून. वाहू लागली आहेत तापी,सुकी, भोकर नद्या दुथडी भरून वाहत आहे.सातपुडा पर्वत रांगांमधील डोंगरदरे मधील ओढे, नाले खळखळाळू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

दुर्गम भागातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी व वर्षाविहारासाठी गारबर्डी धरण पर्यटकांची कायम पसंती असते त्यामुळे, आता पाऊसही चांगला असल्याने हळूहळू गर्दी वाढू लागली आहे.रविवारी रावेर, सावदा, फैजपूर, भुसावळ, जळगाव,यावल,मुक्ताईनगर या भागातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती विशेषतः गारबर्डी धरण, व्ही पॉईंट, पाल येथील धबधबे,सातपुडा घाटातील वळणावळणाचे रस्ते या सातपुडा पर्वतरांगातील निसर्ग सौंदर्याची मजा पर्यटक लुटत आहे.

गारबर्डी धरण येथे रस्ता अरुंद असल्याने अनेक चार चाकी काही तरुण वेगाने चालवत असतात त्यामुळे या भागात किरकोळ अपघातही घडत असल्याने वाहने हळू चालवण्याचे आवाहनही पोलीस यंत्रणेकडून केले जात आहे. महाविद्यालयीन तरुण तरुणी फॅमिली रविवार साजरा करण्यासाठी अनेक कुटुंब गारबडीवर हजेरी लावताना दिसत होते.

हे पण वाचा

टीम झुंजार