Health Benefits of Eating Soaked Almonds On Empty Stomach रात्री भिजवून ठेवलेले बदाम सकाळी उपाशीपोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणं गरजेचं आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण वेळेवर करणे गरजेचं आहे. अनेक लोकं सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टी खाण्याचा सल्ला देतात. ज्यात भिजवलेल्या बदमांचा देखील समावेश आहे. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळे तज्ज्ञ नियमित बदाम खाण्याचा सल्ला देतात.
यासंदर्भात, हेल्थ एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी सांगतात, ”सकाळी रिकाम्या पोटी ४ भिजवलेले बदाम खावेत. यामुळे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.”
भिजवलेले बदाम खाण्याची योग्य पद्धत.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी सांगतात, ”रात्री एक वाटी पाण्यात चार बदाम भिजवावेत, सकाळी पोट साफ केल्यानंतर हे बदाम सोलून खावेत.”
भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे.

बुद्धी तीक्ष्ण होते..
तज्ज्ञांच्या मते, बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. नियमित बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढते. याशिवाय अल्झायमर सारख्या मेंदूच्या समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरते.
चमकदार त्वचा .

ग्लोइंग त्वचा हवी असल्यास नियमित भिजवलेले बदाम खा. रिकाम्या पोटी ४ बदाम खाल्ल्याने त्वचेच्या निगडीत अनेक समस्या दूर होतात. त्यात व्हिटॅमिन ई सोबत अँटिऑक्सिडंट्स देखील आढळते, जे त्वचेच्या पेशींचे सरंक्षण करते.
वेट लॉस.

डॉ. अबरार मुलतानी यांच्या मते, ”बदामामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे आपण अनहेल्दी पदार्थ खाणे टाळतो. नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्याने चयापचय वाढते आणि शरीरातील चरबी जलद बर्न होते.
मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त

बदामांमध्ये उच्च फायबर, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, त्यामध्ये ग्लूकोजचे प्रमाण बरेच कमी असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास खूप उपयुक्त ठरते
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.