पारोळा पोलिसांनी दाखविले माणुसकीचे दर्शन! 19 वर्षीय वेडसर महिलेस पाठविले वेले येथील मानव सेवा केंद्रात.

Spread the love

पारोळा l प्रतिनिधी :- शहरातील दुर्गा पेट्रोल पंपजवळ एक 19 वर्षीय वेडसर महिला भटकताना श्री गुलाब विनायक पाटील यांना आढळून आलेने त्यांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना माहिती देताच क्षणाचाही विलंब न करता वाकोडे साहेबांनी नमूद महिलेस तात्काळ ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता नमूद महिलेने तिचे नाव लता दुता केवटा वय 19 वर्ष रा गुगवा छतीसगढ असे सांगितले असून तात्काळ

मा व्यवस्थापक मानव सेवा केंद्र वेले, चोपडा यांचेशी उपचार व संरक्षण करीता संपर्क करून पारोळा पो स्टे येथील महिला दक्षता कमिटी सदस्या श्रीमती सुवर्णा पाटील,श्रीमती जयश्री साळी यांचे व श्री गुलाब पाटील यांचे मदतीने नमूद वेडसर महिलेस उपचार व नातेवाईकांचे शोध करीता दाखल केले आहे,
पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडने पूर्वी तात्काळ कारवाई करून मानव सेवा केंद्र येथे दाखल केलेने जनतेमध्ये पोलिसानं विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार