एरंडोल पांडववाड्यातील हनुमान मंदीरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती, जमावबंदी आदेश रद्द झाल्यामुळे महाआरतीचे आयोजन.

Spread the love

एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :-येथील पांडववाड्यासमोर असलेल्या पांडववाडा हनुमान मंदिरात काल (ता.२२) रात्री साडेसातवाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.महाआरतीस महिला व युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.शहरातील संपूर्ण भागांमधून महाआरतीस भाविक उपस्थित होते.यावेळी भाविकांनी प्रभू रामचंद्र की जय,बजरंगबली की जय यासह हरहर महादेवच्या घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता. पांडववाडा परिसरात तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जमावबंदी आदेश लागू केला होता.

मात्र औरंगाबाद खंडपिठाने या परिसरात लावण्यात आलेला जमावबंदी आदेश रद्द केल्यामुळे पांडववाडा संघर्ष समिती व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.हिंदुत्ववादी संघटना व पांडववाडा संघर्ष समितीतर्फे हनुमान मंदिरात दररोज मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात येत होती.शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पांडवाडा हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले असल्याचा संदेश सोशलमिडीया व वॉट्स अप च्या माध्यमातून भाविकांना कळविण्यात आल्यामुळे सायंकाळी सात वाजेपासूनच भाविक मंदिर परिसरात उपस्थित होते.

शहरातील सर्वच समाजाचे नागरिक,महिला,व्यापारी, युवक,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांनी श्रीरामासह बजरंगबली की जय यासह हरहर महादेव अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता.महाआरतीमुळे पांडववाडा परिसर सर्वत्र भाविकांच्या गर्दीने भरला होता.विठ्ठल मंदिर ते परदेशी गल्ली पर्यंत भाविक शिस्तीने महाआरतीत सहभागी झाले होते.

यावेळी पांडववाडा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रसाद दंडवते,सचिव अमोल जाधव,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,सुरेश खुरे,डॉ.नरेंद्र पाटील,सतीश परदेशी,भाजपचे शहराध्यक्ष निलेश परदेशी,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील,प्रकाश महाजन,भोला पवार,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, अँड.अजिंक्य काळे,अँड.आकाश महाजन, अँड.दिपेश पांडे, अँड.चंद्रकांत पारखे,अँड.आकाश महाजन, भिका वाणी,सतीश पल्लीवाल,रवींद्र निंबाळकर, भरत महाजन,प्रकाश पाटील माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, शोभना साळी,क्षमा साळी, नीलिमा मानुधने,आरती ठाकूर, रत्ना सोनार

https://www.youtube.com/@zunjaarnews

Like share and Subscribe our youtube Channel

आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ????

यांचेसह व्यापारी,विविध राजकीय व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल,मंगलसिंग पाटील, हवालदार अनिल पाटील,सुनील लोहार,प्रशांत पाटील,जुबेर खाटिक यांचेसह पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.शहरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आल्यामुळे युवकांचा धार्मिकतेकडे कल वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते.

हे पण वाचा

टीम झुंजार