जामनेर (प्रतिनिधी) : मणिपूरमधील महिलांवर अत्याचार केलेल्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी असे पत्र मा. राष्ट्रपती व मा. पंतप्रधान यांना पत्र देण्यात आले असून तशा आशयाचे निवेदन मा. तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार जामनेर यांना देण्यात आले.
मणिपूर राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून हिंसक घटना व जाळपोळ होत आहे. तेथे शांतता कधी प्रस्थापित होईल याची सर्वजण वाट बघत असताना; एक धक्कादायक बातमी आली. मणिपूरची राजधानी इम्फाळा पासून ३५ कि. मी. दूर कंगपोकपी जिल्ह्यात एका समुदायातील लोकांनी दुस-या समुदायातील दोन महिलांना नग्न करून धिंड काढली व त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ बघून देशातील नागरिकांना धक्का बसला. ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ अभियान चालवणा-या, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या संघटनेला सुध्दा यामुळे दु:ख झाले आहे. तसेच हि संघटना या घटनेचा निषेध करते.
महिलांवरील अत्याचारांच्या देशातील वाढत्या घटना बघून आम्ही आग्रहपूर्वक मागणी करतो की अत्याचारग्रस्थ महिलांना न्याय देताना अत्याचारींचा धर्म, जात, राजकीय निष्ठा यांच्या आडून अत्याचारी व्यक्तींना कोणत्याही प्रकारची सूट न देता त्यांना कठोर शिक्षा करावी अशी आम्ही मागणी करतो.
सदर निवेदन महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे, जिल्हा महिला सहभाग प्रमुख सुशिला चौधरी, जामनेर शाखा कार्याध्यक्ष भीमराव दाभाडे, जामनेर महिला सहभाग विभाग प्रमुख शोभा बो-हाडे, कार्यकर्ते संतोष सराफ, रितेश मोरे यांनी दिले.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……