वैशाली :- सध्या देशात ज्योती मौर्या प्रकरणाची एकच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या प्रकरणी वेगवेगळ्या कमेंट आणि पोस्ट पाहायला मिळत आहे. अशातच उत्तरप्रदेशातील ज्योती मौर्या प्रकरणानंतर आता बिहार राज्यातील वैशाली येथून अशीच एक घटना समोर आली आहे.पतीच्या पैशावर महिलेने 11 वी आणि 12 पास केली. तसेच पतीच्या मदतीनेच टीईटीची परीक्षा पास केली. मात्र, महिलेला शिक्षिकेची नोकरी लागल्यावर तिचे आपल्या शाळेतील मुख्याध्यापकासोबत सूत जुळले आणि नोकरी लागल्याच्या दीड वर्षांनी ती प्रियकर मुख्याध्यापकासोबत फरार झाली.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सरिता असे महिला शिक्षिकेचे नाव आहे. या दाम्पत्याला दोन मुलेही आहेत. तर राहुल कुमार असे महिलेचा प्रियकर असलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. शिक्षिकेच्या मुलाने सांगितले की, मम्मी चांगली नाही आहे. त्याला आपल्या वडिलांसोबत राहायचे आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, शाळेच्या मुख्याध्यापकावर सरिताला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे. 13 वर्षांपूर्वी केला प्रेमविवाह – सरिता आणि चंदन असे या दाम्पत्याचे नाव आहे.
चंदन हा महीपुरा गावातील रहिवासी आहे. त्याने 13 वर्षांपूर्वी सरितासोबत प्रेमविवाह केला होता. त्याने सांगितले की, त्याच्या बहिणीच्या सासरवाडीत त्याची सरितासोबत भेट झाली. यानंतर दोन्ही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर दोघांनी लग्न केले.
त्यावेळी सरिता फक्त दहावी पास होती. सरिताला पुढे शिक्षण घ्यायचं होतं. त्यामुळे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी चंदनने मेहनत केली आणि तिला आर्थिक पाठबळ पुरवले. सरिताला तिच्या पुढच्या शिक्षणात कोणतेही व्यत्यय येऊ नये यासाठी, चंदनने शेतीसोबत शिकवणी घ्यायलाही सुरुवात केली.
सर्व काही ठिक सुरू होते. सरिताचे शिक्षणही सुरू होते. यादरम्यान, तिने टीईटी ही परिक्षाही पास केली तसेच तिला नोकरीही लागली. चंदन याने सांगितले की, 2017मध्ये तिने टीईटीची परिक्षा पास केली होती.
यानंतर 25 फेब्रुवारी 2022 मध्ये तिला शिक्षिका म्हणून समस्तीपूर जिल्ह्याच्या शाहपूर पटोरी येथील प्राथमिक विद्यालय नोनफर जोडपूर येथे नोकरी लागली. नोकरी लागताच तिचे त्या शाळेतील मुख्याध्यापक असलेल्या राहुल कुमार नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले आणि दीड वर्षांनंतर ती आपल्या प्रियकर मुख्याध्यापकासोबत फरार झाली. यानंतर चंदनने पोलीस ठाण्यात 7 जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!