CCTV Video: ठाणे रेल्वे स्टेशनवर एक प्रवाशी चालत्या रेल्वेमध्ये चढताना पावसामुळे घसरतो, पुढे काय झाले पहा थरारक व्हिडिओ.

Spread the love

CCTV Video ठाणे :- गेल्या महिनाभरापासून मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचं दिसतंय. सातत्याने रिमझिम सुरू असल्याने प्रवास करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलचा प्रवास देखील त्रासदायक झाला आहे. काही लोकल सेवा बंद असल्याचं दिसून येत आहे.

त्यामुळे लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येतीये. अशातच आता ठाणे रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना घडली आहे. त्याचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही घटना घडली. सेंट्रल रेल्वेने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक प्रवाशी चालत्या रेल्वेमध्ये चढताना त्याचा पाय घसरतो आणि तो तोल बिघडून खाली पडतो.

त्याचवेळी शेजारी असलेल्या दोन आयपीएफ कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला ओढून बाहेर खेचलं. त्यामुळे प्रवाश्याचा जीव वाचला आहे. त्याचा व्हि़डीओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.
ठाणे रेल्वे स्टेशनवर एलटीटी ते अयोध्या एक्स्प्रेसच्या (22183) बोर्डिंग दरम्यान एक प्रवाशी घसरत असताना ड्युटी आयपीएफ कर्मचारी सुमित पाल आणि सागर राठोड यांनी एका प्रवाशाला वाचवलं, अशी माहिती सेंट्रल रेल्वेने दिली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, त्याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.
पाहा Video

दरम्यान, प्रवाशावर रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी धावत्या ट्रेनमध्ये चढू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय. मुंबईकडे जाणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाल्याचं समोर आलं होतं.

हे पण वाचा


टीम झुंजार