पोलिस दलातील मोठ्या अधिकार्‍याने आपली पत्नी आणि पुतण्यावर गोळ्या झाडून केला खून,त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून केली.

Spread the love

पुणे : – पोलीस दलातून एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे. अमरावती येथे सहायक पोलीस आयुक्त असलेल्या पोलीस अधिकार्‍याने आपली पत्नी आणि पुतण्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केला . त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारत गायकवाड असे या सहायक पोलीस आयुक्तांचे नाव आहे.मोनी भारत गायकवाड (वय 44) आणि दीपक गायकवाड (वय 35) अशी खून केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे सध्या अमरवती येथे राजापेठ येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. गेल्या शनिवारी ते पुण्यात सुट्टीवर आले.त्यांचे कुटुंबीय पुण्यात बालेवाडी येथील लक्ष्मणनगरात वास्तव्याला आहेत.
घरी त्यांची पत्नी, पुतण्या, आई, दोन मुले असा परिवार एकत्र राहतो. गेले आठ दिवस ते पुण्यातच होते. त्यांच्या एका मुलाचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला असून दुसराही त्याच क्षेत्रामध्ये आहे. सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गायकवाड यांच्या बेडरुममधून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने बाहेर झोपलेले
पुतणे दीपक व गायकवाड यांचा मुलगा उठला.

गायकवाड यांचे बेडरुम आतून बंद होते. दरवाजा ठोठावला तरी त्यांनी तो न उघडल्याने शेवटी पुतण्या आणि मुलाने दुसर्‍या चावीने दरवाजा उघडला. तेव्हा एसीपी गायकवाड यांच्या हातात पिस्तुल पाहून दीपक याने ते काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात गोळी फायर होऊन ती दीपक यांना लागली. त्यानंतर ते स्वत:वर गोळी घालून घेत होते. हे पाहून त्यांचा मुलाने त्यांना असे काही न करण्याविषयी विनवणी केली. परंतु, त्यांनी तू बाहेर निघ, नाही तर तुलाही गोळी घालेल, असे म्हणून त्याला बाहेर ढकलून दरवाजा बंद केला व स्वत:वर गोळी झाडून घेतली. या घटनेची माहिती मुलाने पोलिसांना कळविली. पाठोपाठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तोपर्यंत तिघांचाही मृत्यु झाला होता. गायकवाड यांनी नेमके कोणत्या कारणामुळे हे कृत्य केले हे अद्याप समोर आलेले नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार