जळगाव,दि.२५ जुलै (जिमाका) – पारोळा तालुक्यात जून ते ऑगस्ट २०२२ कालावधीत झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक व गट नंबर ची माहिती गावातील तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे जमा करावी. असे आवाहन पारोळा तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांनी केले आहे.
पारोळा तालुक्यातील ५८ हजार ६७५ शेतकरी अनुदानासाठी पात्र आहेत. अनुदानाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रणालीवर माहिती भरावयाची असल्याने विलंब टाळावा. माहिती लवकरात लवकर उपलब्ध झाली तर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर जमा करणे प्रशासनाला सोयीचे होईल. असे ही श्री. देवरे यांनी सांगितले आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






