निकृष्ट खतांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी….. गुलाबराव वाघ

Spread the love

प्रतिनिधी l धरणगाव :- जळगाव जिल्ह्यात तसेच धरणगाव तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पावसाळी कपाशी पिकाला सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट या प्रकारचे खत दिल्याने धरणगाव तालुक्यातील भोणे ,बिलखेडे, धरणगाव,गंगापूरी,पष्टाणे,निशाने या गावातील शेतकऱ्यांचे पूर्ण क्षेत्रातील कपाशीचे वाढ खुटणे, पोकळासारखा आकार होणे, मध्यभागी अंकुर न येणे, झाडे पिवळी पडणे ,अशी लक्षणे दिसत आहेत.पूर्ण क्षेत्र खराब होत आहे या बाधित सर्व शेतकऱ्यांना घेऊन शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी अधिकारी श्री देशमाने साहेब यांना संबंधित शेतकऱ्याच्या समस्या बाबतीत धारेवर धरले.असून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई द्यावी व संबंधित कंपन्यांवर गुन्हा दाखल व्हावे अशी जोरदार मागणी करण्यात आली.

देशमाने यांनी सांगितले की,सर्व शेतकऱ्यांची तक्रार घेऊन शेतात पाहणी करून कृषी अधीक्षक जळगाव यांना ताबडतोब अहवाल पाठवतो व संबंधित यंत्रणेकडून पंचनामे करून जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल असे सहकार्य करणार आहे असे आश्र्वासन दिले.
बोगस निकृष्ट दर्जाचे खते विकणा-या कंपन्यांवर गुन्हा दाखल होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी केली.

या प्रसंगी यज्ञेश्वर पाटील (गंगापुरी),सुकलाल खंडु पाटील (बिलखेडा, दिपक पाटील (निशाने), मनोहर पाटील (गंगापुरी),विलास पाटील (गंगापूरी), प्रकाश पाटील (धरणगाव),भिकन पाटील (धरणगांव), संतोष भदाणे (बिलखेडा), इत्यादी बाधित शेतकरी उपस्थित होते.या ठिकाणी जयदीप पाटील शिवसेना तालुका प्रमुख, भागवत चौधरी शिवसेना शहरप्रमुख धरणगांव,संतोष सोनवणे, गजानन महाजन, गोपाल पाटील,शरद शिरसाट, विलास पवार, इत्यादी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार