धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे सर
धरणगाव — अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करत जिद्दीने परिश्रम घेत कु. कोमल सोपान शिंदे या संघर्षकन्येने दुसऱ्या प्रयत्नात PSI पदाला गवसणी घातली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव येथील कानळदा रोड भागातील राजाराम नगर भागात वास्तव्य असणाऱ्या कोमल शिंदे या मुलीने जिद्द व चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केलं. वडील सोपान शिंदे गावोगावी जाऊन कपडे विकतात तर आई भारती शिंदे जैन कंपनीत कामाला जाते. अशा संघर्षमय परिस्थितीत कोमल ने कुठल्याही प्रकारचं कारण न देता कठोर मेहनत घेतली आणि PSI झाली.
यशाला हजार नातेवाईक असतात, अपयश मात्र अनाथ असतं. कोमलने एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले असून आज अनेक नवोदित अभ्यास करण्याऱ्या मुलांसाठी कोमल एक प्रेरणा म्हणून उभी आहे. कोमल च्या या यशाबद्दल तिच्या घरी जाऊन मन ‘में हैं विश्वास’ हा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सक्सेस क्लासेस चे संचालक गुलाबराव पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मयूर चौधरी, महानगराध्यक्ष संदीप पाटील, संघटक गोपाल पाटील, विक्रम पाटील, सागर सोनवणे, रूपेश चौधरी, कुणाल मिस्तरी, भावेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……