या लग्नाची सर्वत्र चर्चा! अंधश्रद्धेला फाटा देत मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालेल्या जोडप्याने स्मशानभूमीत बांधली लग्नगाठ.

Spread the love

अहमदनगर : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. प्रत्येक जण आपले लग्न लक्षात राहावे म्हणून काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच एका हटके लग्नाची संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे.हा विवाहसोहळा पार पडला आहे अहमदनगरमधील स्मशानभूमीत मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या वडिलांनी आपल्या कन्येचा विवाह सोहळा थेट स्मशानभूमीत लावत दिला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?……
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह करत असून इतरांसाठी अशुभ असणारी स्मशानभूमी त्यांच्यासाठी पोटापाण्याचा साधन झाली. याच ठिकाणी राहून आपल्या मुलीच शिक्षण पूर्ण केलं. मयुरीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्नासाठी वराची निवड करण्यात आली आणि लग्न थेट स्मशानभूमीतच लावण्याचा निर्णय गायकवाड दाम्पत्याने घेतला. सोहळा सुद्धा अगदी थाटामाटात पार पडला. मयुरी व मनोज यांच्या विवाह सोहळ्यासाठी स्मशानभूमीतच मांडव टाकण्यात आला. सनई चौघाड्यांचा सुरात आणि शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मैत्रीचे प्रेमात रूपांतर……
नववधू मयुरीचे राहाता येथे मयुरीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले तर शिर्डीत वास्तव्य करणाऱ्या मनोज जयस्वाल यांचंही शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्यानंतर दोघेही शिर्डी येथील एका ठिकाणी कामाला असल्याने त्यांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पुढे जाऊन त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. घरच्यांनीसुद्धा त्यांच्या लग्नाला होकार दिला आणि हा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला. सध्या या लग्नाची संपूर्ण राज्यात चर्चा होताना दिसत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार