5 मुलाची आई गेली प्रियकासोबत राहायला, मुलाच्या वाढदिवसाच्या बहाणा करून पतीला बोलावले फार्मवर अन् पुढे काय? झाले वाचा.

Spread the love

दरभंगा :- देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून आत्महत्या, हत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत.यातच आता आणकी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार राज्यातील दरभंगाच्या कमरौली गावात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. राम कुमार साह उर्फ मुन्ना साह असे निर्घृण हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या पत्नीला तसेच तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण – ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कमरौली कुंवरपट्टी भरवाडा टोलनाका परिसरात कुंदलाल दास यांच्या पोल्ट्री फार्मवर येथे घडली. आरोपी संगीता देवी ही जीविका दीदी म्हणून काम करते, तर तिचा प्रियकर कुंदनलाल दास रेल्वेत पॉइंट मॅन म्हणून काम करतो. याप्रकरणी डीएसपी इम्रान अहमद यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुन्ना साहला 4 मुली आणि 1 मुलगा आहे.

त्याची पत्नी ही आपल्या 4 मुली आणि एका मुलासह भरवाडा टोल येथील तिच्या प्रियकराच्या पोल्ट्री फार्ममध्ये एक महिन्यापासून राहत होती. घटनेच्या रात्री आरोपी महिलेने तिच्या पतीला प्रियकराच्या फार्महाऊसवर बोलावून घेतले. त्यांचा एकुलता एक मुलगा माधव कुमारचा वाढदिवस आहे, असे कारण तिने त्याला सांगितले. त्यानंतर मुन्ना साहने त्याच्या गावातील तरुण अनोज कामती याला आपल्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी आहे. मला बाईकने फॉर्मवर घेऊन जा, असे सांगितले.

मात्र, मुन्ना साह फार्महाऊसवर पोहोचताच कुंदनलाल दास आणि संगीता देवी यांनी मुन्ना साहला पकडले. तसेच पोल्ट्री फार्मच्या खांबाला दोरीने बांधले. यानंतर कुंदनलाल दासने मुन्ना साहच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे मुन्ना साहच्या उजव्या डोळ्यातून रक्तस्त्राव होऊ लागला आणि मुन्ना बेशुद्ध पडला. मुन्ना बेशुद्ध पडल्यानंतर संगीता देवी आणि कुंदनलाल यांनी त्याला विटा आणि दगडांनी जोरदार मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की, संगीता देवी तिचा पती मुन्ना साह याला लाथा-बुक्क्यांनी आणि विटा आणि दगडांनी मारहाण करत आहे.

मुन्ना शाहची आईही घटनास्थळी पोहोचली होती. तिने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संगीता देवीने तिचे ऐकले नाही आणि मुन्नाला मारहाण करत राहिली. दरम्यान, पत्नी आणि तिच्या प्रियकराने केलेल्या हल्ल्यामुळे मुन्ना साहचा मृत्यू झाला.

हे पण वाचा


टीम झुंजार