मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : संकल्प संस्था आणि आरिन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या पुढाकाराने आणि आरिन फाऊंडेशनचे अध्यक्ष नितेश मिसाळ यांच्या माध्यमातून एम/पूर्व विभागातील शिवाजी नगर, मानखुर्द, वाशी नाका चेंबुर येथील वस्तीतील गरजू कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
संकल्प संस्था गेली १२ वर्षांपासून चेंबूर गोवंडी शिवाजी नगर मानखुर्द या एम/पूर्व विभागात वस्ती विकास प्रकल्पा अंतर्गत शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि वस्ती संघटन या विषयावर कार्य करीत आहे. त्यातील महत्वाचा एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरिन फाउंडेशनच्या माध्यमातून २०० होतकरू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सविता हेंडवे यानी काम पाहिले. शकीला तांबोळी यांनी कार्यक्रमाची नियोजनबद्ध आखणी केली. यावेळी आरिन फाऊंडेशनचे प्रबंधक किरण जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
संकल्प संस्थेच्या अरुणा मोरे यांनी एम पूर्व विभागामधील वस्ती विकास प्रकल्पा अंतर्गत कार्याबद्दल तसेच भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कपिल क्षीरसागर, वनिता सावंत, सीमा परिहार, फरीदा अत्तार, निर्मला सावंत, अश्फाक तांबोळी, प्रतिक्षा पवार, अश्विनी भंडारे, विमल देवकाते, उमा चंदनशिवे, लक्ष्मी पगारे, मीना रमानी यांचे विशेष सहकार्य लाभले.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.