एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाची ४ ऑगस्टला निवडणूक.

Spread the love

एरंडोल | प्रतिनिधी एरंडोल- येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक चार ऑगस्टला होणार आहे.सुमारे नऊ वर्षापासून कै.डॉ.कांतीलाल काबरा आणि मनोज बिर्ला यांच्या गटात वादविवाद सुरु असल्यामुळे संस्थेच्या निवडणुकीसाठी तसेच कामकाजाविषयी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.शिक्षण संस्थेतील वादाचा निकाल लागल्यामुळे तसेच निवडणूक होणार असल्यामुळे सभासदांसह पालकवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कांतीलाल काबरे यांचे निधन झाल्यामुळे संस्थेच्यावतीने श्रीकांत काबरे यांनी काबरे गटातर्फे न्यायालयीन प्रक्रियेत दाखल करण्यात आली.

एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळात कै.कांतीलाल काबरा आणि मनोज बिर्ला या दोन गटात नऊ वर्षांपासून वाद सुरु होता.धर्मादाय उपायुक्त,न्यायालय याठिकाणी दोन्ही गटातर्फे दावे प्रतिदावे करण्यात आले होते.यामध्ये तत्कालीन अध्यक्ष कै.कांतीलाल काबरा यांचा बदल अर्ज धर्मादाय उपायुक्तांकडे मंजूर करण्यात आला तर मनोज बिर्ला यांचा बदल अर्ज नामंजूर करण्यात आला.धर्मादाय आयुक्त एम.डी.गाडे यांनी अध्यक्ष मनोज बिर्ला यांनी
वाढवलेले बेकायदेशीर सभासद रद्द करण्याचे देखील आदेश दिले आहेत.

धर्मदाय आयुक्त एम.डी.गाडे यांनी कै.कांतीलाल काबरा यांनी दाखल केलेला बदल अर्ज क्रमांक ११७३/१८ अंशत: मंजूर केला.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या मार्गदर्शनानुसार धर्मदाय उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाची ४ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.धर्मादाय आयुक्त यांकडे डॉ.कै.कांतीलाल काबरे यांचेवतीने advt.आर.डी.बर्डे यांनी तर शरद काबरा यांचेवतीने advt.महेश काबरा यांनी बाजू मांडली.मनोज बिर्ला यांचेवतीने advt.दिलीप मंडोरे यांनी कामकाज पाहिले.

औरंगाबाद खंडपीठात कै.कांतीलाल काबरे यांचेतर्फे advt.विनायक होन आणि advt.दिपेश पांडे
यांनी कामकाज पाहिले.सुमारे नऊ वर्षांपासून संस्थेच्या दोन गटात सुरु असलेला वाद निकाली झाल्यामुळे सभासदांसह पालकवर्गात समाधान व्यक्त केले
जात आहे.एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचीएरंडोल, पाळधी,उत्राण येथे माध्यमिक विद्यालय असून एरंडोल येथे प्राथमिक विद्यामंदिर आहेत.तसेच एक इंग्रजी माध्यमाची शाळा देखील आहे.संस्थेच्या दोन गटात वाद सुरु असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.दरम्यान ४ ऑगस्ट रोजी होणा-या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले असून निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार