Viral Video: लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेठणीस येतं नाही आहेत. मुलींच्या छेडछाडीची कितीतरी प्रकरणं समोर येतात. काही मुली भीतीने निमूटपणे सहन करत राहतात. तर काही जशास तसा जवाब देतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गावातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याची अशी अवस्था झाली की पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही घटना उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील आहे, जिथे एका पुरुषाने एका महिलेचा विनयभंग केला त्यानंतर संपूर्ण गावात अर्धनग्न अवस्थेत त्याची धिंड काढण्यात आली. या व्यक्तीच्या गळ्यात चपला आणि चपलांचा हार घातल्यानंतर त्याच्या चेहऱ्याला काळही फासण्यात आलं. यासोबतच व्हिडिओमध्ये एक महिला या व्यक्तीला चप्पलने मारताना दिसत आहे. गावातील काही लोकांसमोर ही महिला या व्यक्तीला चप्पलने खूप मारते.
एकीकडे मणिपूरच्या घटनेने देशभर संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे विनयभंगाची घटना समोर आल्यानंतर आरोपींना बेदम मारहाण करण्यात आली. विनयभंग करुन चोरटे पळून गेल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अनेक वेळा आरोपीला लोक पकडतात, त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली जाते. या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत हे मणिपूर नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पहा व्हिडिओ
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






