अनाथ मुलांच्या बालगृहातील पाच बालिकांवर कर्मचा-याकडून लैंगिक अत्याचार, कर्मचा-यासह त्याच्या पत्नीस अटक.

Spread the love

संशयित आरोपीस पांच दिवसांची पोलीस कस्टडी महिलेस न्यायालयीन कस्टडी, एक संशयित फरार.

एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील एका गावात अनाथ बालकांच्या बालगुहातील नऊ ते बारा वयोगटातील दलित व अदिवासी समाजाच्या पाच अल्पवयीन बालिकांवर
वसतीगृहातील काळजीवाहक पदावर असलेल्या कर्मचा-याने लैंगिक अत्याचार करून अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांनी वसतीगृहातील काळजी वाहक व त्याची पत्नी यांना अटक केली असून संस्थेचा सचिव असलेला तिसरा संशयित फरार झाला आहे.अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता काळजीवाहक कर्मचा-यास पाच दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचा तर त्यांची पत्नी तथा
वस्तीगृह अधीक्षिका ………यांना न्यायालयीन कोठडीत न्यायाधीश श्री.राजूरकर यांनी सुनावली.

याबाबत माहिती अशी,की एरंडोल तालुक्यातील एका गावात अनाथ मुलांचे बालगृह असून याठिकाणी अनाथ अल्पवयीन मुले व मुलींना संगोपनासाठी ठेवण्यात येते.बलागृहात असलेल्या पाच ते बारा वयोगटातील पाच अल्पवयीन मुलींवर संस्थेचा काळजी वाहक पदावर असलेल्या गणेश शिवाजी पंडित याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पिडीत बालीकांनी बालकल्याण समिती जळगाव यांचेकडे केली.

बालकल्याण समितीच्या सदस्या वैशाली विसपुते यांनी बालिकांनी त्यांचेवर झालेल्या अत्याचाराची माहिती मोबाईलमध्ये शुटींग करून घेतली.यावेळी बालकल्याण समिती सदस्या अँड.विद्या बोरनारे,अँड.देवयानी गोविंदवार यादेखील उपस्थित होत्या. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी डॉ.वनिता डी.सोनगत यांनी एरंडोल पोलीस स्थानकात घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी उपनिरीक्षक शरद बागल यांना चौकशी करण्याचे सांगितले.

(ता.२६ जुलै) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदनवाळ यांनी त्या बालगुहात जाऊन घटनेची माही जाणून घेतली.पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी जळगाव येथे बालकल्याण समिती सदस्या वैशाली विसपुते यांची भेट घेवून माहिती जाणून घेतली. बालगृहातील पाच अल्पवयीन बालिकांवर ऑगस्ट २२ ते जून २३ या कालावधीत संस्थेतील काळजीवाहक पदावर असलेला कर्मचारी गणेश शिवाजी पंडित याने अनेकवेळा लैंगिक अत्याचार करून अनैसर्गिक कृत्य केले असल्याचे निष्पन्न झाले.

अत्याचार पिडीत बालीकांनी त्यांच्यावर गणेश पंडित यांचेकडून होत असलेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती वसतीगृहाचे अधीक्षक व सचिव यांचेकडे केली असतांना देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले.याबाबत उपनिरीक्षक शरद बागल यांनी दिलेल्या तक्रारीवरून वस्तीगृहाचे काळजीवाहक गणेश शिवाजी पंडित,त्यांच्या पत्नी तथा वसतिगृह अधीक्षक अरुणा गणेश पंडित आणि संस्थेचे सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गणेश पंडित आणि अरुणा पंडित याना अटक केली असून सचिव भिवाजी पाटील हे फरार झाले आहेत.

अनाथ बालगृहातील अल्पवयीन बालिकांवर वस्तीगृहाच्या कर्मचा-यानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया
व्यक्त केल्या जात आहेत.दरम्यान खडके बुद्रुक येथील अनाथ मुलांच्या बालगृहात १९ विद्यार्थिनी होत्या.संस्थेला शासनाकडून अनुदान प्राप्त होत नसल्याचे कारण देत ते बंद करण्याबाबत संस्थेकडून नोव्हेंबर २२ पासून
बालकल्याण समिती यांचेकडे पत्रव्यवहार करण्यात येत होता.संस्थेने बालगृहबंद करण्याबाबत केलेल्या पत्रव्यवहारामुळे बालकल्याण समितीच्या सदस्यांनी
संठेतील १९ पैकी आठ बालिकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले होते तर उर्वरित ११ बालिकांना जिल्हा परीविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालित मुलींचे बालगृह जळगाव येथे तात्पुरत्या स्वरूपात दाखल करण्यात आले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार