एरंडोल l प्रतिनिधी
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एरंडोलला शिवसेनेतर्फे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले… नुकत्याच इरशाळवाडी येथे झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचा वाढदिवसचा कोणताही सोहळा साजरा न करता सामाजिक उपक्रमाद्वारे जनतेची सेवा करून साजरा करावा अशा आशयाची सूचना शिवसैनिकांना केली होती. त्याच पार्श्वभूमीवर एरंडोल शिवसेनेतर्फे ग्रामीण रुग्णालयातील गरजू रुग्णांना फळे वाटप करून सहकार्य करण्यात आले….
तसेच याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेऊन सदैव पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना साथ देण्याचे वचन दिले…. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन,
शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेना शहरप्रमुख प्रमोद महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहित पुराणिक,दशरथ चौधरी, परेश बिर्ला, हेमंत भोळे, अमोल भावसार, चंदू जोहरी, रवींद्र चौधरी, बाळा राजपूत, कल्पेश राजपूत, नितीन महाजन, प्रसाद महाजन, कुणाल पाटील, दीपक गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते….
https://www.youtube.com/@zunjaarnews
Like share and Subscribe our youtube Channel
आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ????
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






