एरंडोल तालुक्यातील वसतिगृहात आदिवासी व दलित अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अपराधींना तात्काळ शासन करा -लोकसंघर्ष मोर्चा

Spread the love

जळगाव :- एरंडोल तालुक्यातील वसतिगृहात 5 अल्पवयीन विद्यार्थिनींवर तेथील प्रभारी कर्मचारी गेले वर्षभर जबरदस्ती करत होता व त्यांचे शोषण ही करत होता. याबद्दल त्या विद्यार्थिनींनी वारंवार अधिक्षिका व संस्थाचालिकांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही उलट या अधिक्षेकेच्या पतीनेही या विद्यार्थिनींन सोबत गैरकृत्य केल्याची माहिती मिळाली आहे ही अत्यंत गंभीर घटना आहे. ह्याचा लोक संघर्ष मोर्चा तीव्र निषेध करीत असून दोषींना कड्क शासन करण्याची मागणी करीत आहोत.

तसेच त्या वसतीगृहाचा परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी करत. वसतिगृहात राहून शिकणाऱ्या मुलामुलींना तात्काळ जवळच्या शासकीय वसतिगृहात हलविण्याची मागणी करीत आहोत.
वसतिगृहातील मुलींवर ओढवलेला असा दुर्दैवी प्रसंग अमानवी व भयंकर आहेच परंतु या राज्यात आश्रमशाळा व वसतिगृहे यात शिकणाऱ्या दलित व आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे राज्यात असे प्रसंग वारंवार घडत आहेत या बाबतीत वेळेवर मुलींच्या तक्रारींची दखल न घेणे, संबधित कर्मचारी अथवा गुन्हेगाराला पाठीशी घालणे वेळेवर शिक्षा न होणे या मुळे असे कृत्य करण्याची प्रवृत्ती या पुरोगामी राज्यात वाढलेली आहे
या बाबतीत विधानपरिषदेत गृहमंत्री व मुख्यमंत्री उत्तरे देतीलच परंतु नुकतीच मणिपूर येथील आदिवासी महिलांवरच्या अत्याचाराचे प्रकरण धुमसत असतांना महाराष्ट्रात ही अश्या प्रकारची घटना घडणे ही संताप आणणारी बाब असून प्रशासनाने आता सहनशीलतेचा अंत पाहू नये या घटनेच्या बाबतीत त्वरित महिला पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून घटनेचा तपास केला जावा या साठी शीघ्र न्यायालय नेमून ही केस फास्ट ट्रॅक चालवली जावी
पीडित मुलींना तात्काळ संरक्षण दिले जावे तसेच त्यांना आर्थिक मदत केली जावी

या अमानवी गुन्ह्यात जे जे लिंगपिसाट सहभागी आहेत त्यांना त्वरित फाशी सारखी गंभीर शिक्षा केली जावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चा जिल्हा प्रशासनाला करीत असून या बाबतचे निवेदन विधानपरिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पाठवत आहेत वेळीच या बाबतीत न्याय झाला नाही तर लोकसंघर्ष मोर्चा रस्त्यावर उतरून या बाबतीत आंदोलन करेल याची ही दखल घेतली जावी आपले प्रतिभा शिंदे,ताराचंद बारेला, कैलास मोरे, मन्सूर तडवी, सुभाष भिल, नंदा मावळे, बन्सीलाल पारधी, सुभाष पावरा,पूजा नाईक , लक्ष्मी तडवी, बनी बाई वसावे ,सचिन धांडे यांनी केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार