जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
नवीन ओळखी होतील. हस्तकलेला वाव द्यावा. मानसिक संतुलन राखावे. भावंडांना मदत कराल. चांगले साहित्य वाचनात येईल.
वृषभ :-
मनातील इच्छा पूर्ण होईल. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन योजनांकडे बारीक लक्ष ठेवा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन :-
जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. नातेवाईकांना मदत कराल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. योजनाबद्ध कामे करावीत. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाका.
कर्क :-
ज्येष्ठ मंडळींशी तारतम्यतेने वागा. स्वत:विषयीचा चुकीचा ग्रह काढून टाका. जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करा. अनावश्यक खर्च टाळा.
सिंह :-
दिवसभर संयम बाळगावा लागेल. कामात दिवसभर गढून जाल. काही नवीन खरेदी करण्याची संधी लाभेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभाची शक्यता.
कन्या :-
नवीन कल्पना कृतीत आणाल. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने कामे करावीत. हातून शुभकार्य घडेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.
तूळ :-
आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. दिवसभर कामाचा ताण राहील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. नवीन कामाची योजना आखाल.
वृश्चिक :-
गुंतवणूक करताना सावध राहावे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका.
धनू :-
जोडीदाराकडून तुमची इच्छा पूर्ण होईल. जमिनीच्या कामात गुंतवणूक कराल. दैनंदिन कामात थोडासा बदल करून पहावा. समोर आलेली संधी ओळखा. आईशी वादाचे प्रसंग टाळावेत.
मकर :-
मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. योग्य वेळेची वाट पहावी. भावंडांशी मतभेद टाळावेत. निर्धारित कामात आळस करू नका. स्वत:साठीही थोडा वेळ काढावा.
कुंभ :-
निराशाजनक विचार टाळावेत. आपलेच म्हणणे खरे कराल. गरजेच्या वस्तू खरेदी कराल. मौसमी आजारांपासून काळजी घ्यावी. चैनीवर खर्च कराल.
मीन :-
मुलांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. व्यापारात जोखीम पत्कारावी लागेल. दिवस अनुकूल राहील. संयमाने समस्या सुटू शकतात. बरेच दिवसांनी नातेवाईकांची गाठ पडेल.
हेही वाचलंत का ?
- ViralVideo:पतीने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत भररस्त्यात रंगेहात पकडले, पतीला आला संताप, पुढे काय झालं पहा व्हिडिओ.
- मुख्याध्यापिकेला रग्गड पगार तरीपण पैशांचा मोह आवरेना; प्रसूती रजा मंजुरीसाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.
- अमळनेर तालुक्यात ३२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा.
- पंचायत समिती कडुन नागरीकांना होणाऱ्या गैरसोयी तातडीने थांबवा – आमदार मा.अमोलदादा पाटील
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.