शिरसाळे व लोण येथे पोलिसांची धाड, हातभट्टी उश्वस्त तीन जण ताब्यात, तिन्हीविरुद्ध दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल

Spread the love

अमळनेर :- तालुक्यातील शिरसाळे व लोण खुर्द येथे गावठी दारूची निर्मिती करून खुलेआम विक्री होत असल्याची गुप्त माहिती मारवड पोलिस ठाण्याचे एपीआय सुशीलकुमार नाईक यांना मिळाल्याने दोन वेगवेगळी पथके तयार करून छापा टाकला असता लोण खुर्द गावात भिलाटी भागात गावठी दारूची निर्मितीची जिवंत हातभट्टी उध्वस्त करून मुद्देमालसह एकाला ताब्यात घेऊन त्याच गावात दुसऱ्या बाजूला हातभट्टी नष्ट करून मुद्देमाल सोडून पळ काढणाऱ्या एकाला रंगेहाथ पकडून शिरसाळे येथे ही कारवाई केली असे तिन्ही जणांना ताब्यात घेऊन त्यांचा विरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना गोपनीय माहिती मिळल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, हवालदार भरत गायकवाड, पोलीस नाईक भरत ईशी, पोलीस अनिल राठोड ,गुलाब मांगो महाजन ,पोलीस पाटील उदय पाटील यांच्या पथकाने लोण खु व शिरसाळे बु येथे संयुक्त पणे धाड सत्र राबवून गावठी दारू निर्मिती करून विक्रीकरणाऱ्या विरुद्ध व हातभट्टीवर उध्दव करून कारवाई करण्यासाठी .

पोलिसांना लोण ते झाडी रस्त्यावर किशोर अधिकार भिल वय ३६ हा गावठी दारू विकताना आढळून आला. त्याच्याजवळून १८०० रुपये किमतीची २१ लिटर दारू जप्त करण्यात आली. तर तेथेच बाजूला सुखदेव धनसिंग भिल वय ४७ याची गावठी दारूची हातभट्टी सुरू होती. पोलिसांनी १ हजार रुपयांचे २५ लिटर कच्चे रसायन,३ हजार रुपये किमतीचे ७ लहान प्लास्टिक ड्रम व २ मोठे ड्रम गूळ मिश्रित रसायन तसेच १५ लिटर दारू जप्त करून भट्टी उश्वस्त केली. तर शिरसाळे येथे छापा टाकून सुमनबाई गोरख भिल वय ५५ हिला देखील दारू विकताना पकडले असता तिच्या कडून १५०० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली

या बाबत अनिल राठोड ,भरत ईशी व गुलाब महाजन यांच्या फिर्यादीवरून सुखदेव धनसिंग भिल ,किशोर अधिकार भिल दोन्ही राहणार लोण खुर्द व सुमनबाई गोरख भिल राहणार शिरसाळे यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल केला आहे , गुन्ह्यांचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल भरत ईशी व महिला हेडकॉन्स्टेबल रेखा ईशी करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार