पुणे :- येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीसमोरच पत्नीवर बलात्कार केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
तर, अमानुष गुन्हा करणाऱ्या या आरोपीला पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. नराधमाची भरपावसात धिंड काढली आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या या दणक्याची सध्या शहरात एकच चर्चा आहे.
उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पैसे उसने घेणाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक पुण्यातील हडपसर प्रकार परिसरात घडला होता. या गुन्ह्यातील नरधमाची हडपसर परिसरात गुरुवारी भरपावसात पोलिसांनी धिंड काढली. इम्तियाज हशीम शेख (वय ४७, म्हाडा कॉलनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बोपखेल येथील ३४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती.
त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. मसाले विक्रेता आरोपी इम्तियाज शेख याने फिर्यादी महिलेच्या पतीस ४० हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे ते परत करू शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये इम्तियाज याने पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगर येथे बोलावून घेतले. तेथे त्याने पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. उसने पैसे परत न केल्याच्या वादातून पतीसमोरच पत्नीवर बलात्कार केला होता.
त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने याच कारणातून तिच्याकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी केली होती. मात्र यावेळी पीडित महिलेने त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने त्याच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले चित्रीकरण पतीला पाठवून व व्हिडीओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करत बदनामीचा प्रयत्न केला. पीडितेने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत भरपावसात शहरात त्याची धिंड काढली आहे. पुणे पोलिसांच्या या कृतीचे स्वागत होत आहे. तर, अशा नराधमांना असेच समाजासमोर आणून त्यांचा चेहरा उघड करावा, असे मतही व्यक्त होत आहे.
हे पण वाचा
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.