खडके बू.येथील अनाथ मुलांच्या बालगृहातील अल्पवयीन मुलांवरही लैंगिक अत्याचार. संस्थाध्यक्षांसह त्याच्या दोन्ही मुलांवर गुन्हा.

Spread the love

पहिल्या गुन्ह्यातील एक व या गुन्ह्यातीन तिन्ही संशयित आरोपी फरार. मुली आणि मुले यांच्यावर लैंगिक अत्याचाराची घटनेमुळे सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया.

एरंडोल l प्रतिनिधी

एरंडोल :- खडके बुद्रुक ता.एरंडोल येथील अनाथ मुलांच्या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला वसतीगृहाचा काळजीवाहक गणेश पंडित याने अल्पवयीन मुलांवर देखील लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पिडीताने दाखल केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.काळजीवाहक गणेश पंडित याच्या चिथावणीमुळे अनाथ मुलांच्या अल्पवयीन बालकांनी अत्याचार पिडीत बालकास मारहाण केल्याचे पिडीत बालकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.याबाबत संस्थेचे अध्यक्ष,त्यांची दोन्ही मुले,काळजीवाहक व मारहाण करणारे अल्पवयीन बालके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी,की खडके बुद्रुक येथे तळई येथील कै.यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अनाथ मुलांचे व मुलींचे बालगृहआहे.या बालगृहातील अल्पवयीन बालिकांवर वस्तीगृहाचे काळजीवाहक गणेश पंडित याने लैंगिक अत्याचार करून अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार दाखल झाल असून संशयित गणेश पंडित यास अटक केली आहे.आज बालगृहातील बालकाने देखील गणेश पंडित याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अकरा वर्षीय अल्पवयीन बालकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की होळीच्या दिवशी अल्पवयीन बालकाने पाणी भरले नाही म्हणून वसतीगृहाचे काळजीवाहक गणेश पंडित याच्या सांगण्यावरून अनाथ अल्पवयीन बालकांनी पिडीत बालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.तसेच काळजीवाहक गणेश पंडित याने एका रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वसतीगृहात कोणीही नसल्याचा फायदा घेत पिडीत बालक बाथरूममध्ये गेला असता त्याचेवर शारीरिक व लैंगिक अत्याचार केला.जळगाव येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशी नंतर अल्पवयीन बालकावर देखील अत्याचार केल्याचे उघडकीस आले.

चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर,पोल्स निरीक्षक सतीश गोराडे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती जाणून घेतली.याबाबत पिडीत बालकाच्या तक्रारीवरून पोलीसस्थानकात वस्तीगृहाचा काळजीवाहक गणेश शिवाजी पंडित,संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील, सचिन प्रभाकर पाटील,भूषण प्रभाकर पाटील यांचेसह वस्तीगृहातील आठ अल्पवयीन बालके यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे तपास करीत आहेत.

संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांचेसह त्यांचे दोन्ही पुत्र सचिन पाटील व भूषण पाटील फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.गुन्ह्यातील सर्व अल्पवयीन बालकांना जळगाव येथील मुलांच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे.अनाथ मुलांच्या बालगृहातील अल्पवयीन मुली आणि मुले यांच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यामुळे सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून दोषींना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार