उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठकीत विविध विभागातील आढावा घेऊन संपन्न

Spread the love

एरंडोल l प्रतिनिधी :- एरंडोल येथील पंचायत समितीच्या हॉल येथे आयोजित करण्यात आलेली होती. म. उपविभागीय अधिकारी आदरणीय श्री. मनिषकुमार गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यक्षेत्रातील म. एरंडोल तहसीलदार सौ. सुचिता चव्हाण मॅडम, व पारोळा तहसीलदार देवरे साहेब व धरणगाव तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक सदस्य व समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी श्री.जाधव साहेब, तसेच पारोळा व धरणगाव गटविकास अधिकारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने विविध विभागातील अधिकारी तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती. शैलजा पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी बैठकीत अनुसूचित जाती व जमाती यांच्या योजनांची त्वरित उपाययोजना करण्यात साठी ठराव मंजूर करण्यात आला. १) एरंडोल शहरातील मातोश्री नगर , पद्मालय नगर तसेच कॉलनी परिसर भागात रस्ते वर न.पा.ने पाईपलाईन खोदकाम केलेले असून सद्यस्थितीत पावसाळा सुरू असताना देखील सदरचे खोदकाम करण्यात आले. मात्र पावसाच्या पाण्यामुळे पूर्णत चिखल झालेला असून पायी सुध्दा चालता येत नाही. वयोवृद्ध, लहान बालके पाय घसरून जमिनीवर पडून काही बालके फॅक्चर होत आहेत .

तसेच एरंडोल न.पा. मुख्याधिकारी सो. यांना निवेदन देऊन सुद्धा सदर ची समस्या कडे दुर्लक्ष होत आहे. मातोश्री नगर येथे श्री.महाजन डॉ. यांचे घराजवळ खूपच चिखल गारा झालेला असून सदरची समस्या तात्काळ सोडविणे आवश्यक आहे.२) शैक्षणिक संस्थांमध्ये अनुशेष त्वरित भरती प्रक्रिया सुरू करावी. ३) राष्ट्रीयकृत बँकेतील केंद्र व राज्य सरकारच्या योजना ची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. ४) भूमिहीन मजुरांना शासनाच्या अटी शर्तीवर भाडेपट्ट्यांनी शासकीय जमिनीचे वाटप करण्यात यावे.५) अनुसूचित जाती व जमाती यांच्या वस्ती मध्ये इस्टिमेट नुसार विकास कामे करण्यात यावेत.

दलित वस्तीच्या निधी दलित वस्तीमध्येच खर्च करण्यात यावा. ६) मागासवर्गीय यांच्यासाठी ग्रामनिधीतून दरवर्षी १५% निधी खर्च करण्यात यावा. वरील उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागास आदेश करण्यात आले.तसेच मा. गायकवाड साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करत अधिकारी व समितीचे सदस्य यांना शासनाकीय योजनाची माहिती दिली.मा.गायकवाड साहेब व उपस्थित अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. एरंडोल तहसीलदार सौ.मॅडम यांनी मतदार नोंदणी मोहीम विषयी मार्गदर्शन केले.तसेच एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव साहेब यांनी रमाई घरकुल व शबरी घरकुल योजनेची माहिती दिली.व घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करा . असे बैठकीदरम्यान कळविले.

यावेळी समिती सदस्य श्री देवानंद भाऊ बेहेरे, प्रवीण बाविस्कर, सुनिल भाऊ खोकरे, धरणगाव, तालुक्यातील सदस्य मुकुंद नन्नवरे, पारोळा, तालुक्यातील सदस्य राजेंद्र भाऊ जावरे यांनी आपल्या तालुक्यातील समस्या सविस्तर मांडण्यात आले व उपाय योजना करण्यासाठी तातडीने आदेश करावेत. असे बैठकीत संबंधित अधिकारी प्रशासनास विनंती केली आहे.तसेच कासोदा पोलीस स्टेशन चे निरिक्षक व प्रतिनिधी यांची उपस्थिती नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार