धक्कादायक! एका शिक्षीका कोचिंग क्लासेसच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना धर्मांतराच्या गोरखधंदा उघडकीस,महिलेसह तिघांना अटक.

Spread the love

अहमनगर : जिल्ह्यातील उंबरे गावात दोन समाजात झालेल्या वादाची पार्श्वभूमी आता समोर आली आहे. अल्पवयीन मुलींना शिकवणीच्या नावाखाली एका शिक्षिकेने धर्मांतराकडे लोटण्याचा गोरखधंदा सुरू केलेला होता .मुलींना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासोबतच नकार देणाऱ्या मुलींना धमकावलं जात होतं. हिम्मत करुन एका मुलीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आणखी दोन मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.

काय घडला होता नेमका प्रकार?
राहुरी तालुक्यातील उंबरे गावात दोन समाजात वाद झाल होता. आठवी नववीत शिकणाऱ्या लहान मुलींना धर्मांतराच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा धक्कादायक प्रकार सुरु होता. गावातील एक शिक्षीका कोचिंग क्लासेस चालवते. मात्र शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन हिंदू मुलींना इस्लाम कसा चांगला आहे, या धर्मात आलात तर काय फायदे आहेत? याची शिकवणी सुरू होती. धक्कादायक म्हणजे काही मुलींची मुस्लिम तरूणांसोबत ओळख करून देऊन त्यांना प्रेमाच्या जाळयात ओढण्याचाही प्रकार समोर आला आहे. विरोध केला तर फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांचे तोंड बंद केली जात होती. काही मुलींनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.

असा चालायचा धर्मांतराचा गोरखधंदा…
आरोपी महिलेचं नाव हिना शेख असं आहे, ती गावात ट्यूशन क्लासेस चालवायची. ट्यूशनला येणाऱअया मुलींना इस्लाम धर्माबाबत माहिती दिली जायची. तसंच मुस्लिम मुलांशी मैत्री करायला भाग पाडायची. बांगड्या घालून शिकवणीला येत जाऊ नका असं मुलींना सांगितलं जात होतं. रमजानच्या दिवशी ट्यूशनमधल्या काही मुलींचे मुलांसोबत फोटो काढले, त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलींवर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. शेवटी मुलींनी घाबरून हा प्रकार घरी सांगितला.

चौकशी करुन कारवाई करणार..
राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील घडलेल्या प्रकरासंदर्भात 27 आणि 28 जुलैला 5 गुन्हे राहुरी पोलिसांनी दाखल केले असून एका महिलेसह तीन आरोपींना राहुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी गुन्ह्याचा प्राथमिक तपास सुरू आहे. या प्रकरणात आधिक तपास सुरू असून प्रकरणात आरोपी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनजंय जाधव यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अश्या घटना घडतील तेथील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. तसंच त्यांनी उंबरे गावातील घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार