1 हजार 600 मीटर अल्युमिनियम विजेच्या तारांची चोरी,अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दखल.

Spread the love

अमळनेर :- तालुक्यातील एकलहरे शिवारातून चोरट्याने १६०० मीटर लांबीची अल्युमिनियमची विजेची तार चोरुन नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २६ रोजी सकाळी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमोद पाटील हे एकलहरे शिवारात लाईन चेक करण्यासाठी गेले असता त्यांना आठ गाळ्यांची अल्युमिनियमची तार दिसून आली नाही.

त्यांनी शिवारातील शेतकऱ्यांना सोबत घेत पाहणी केली असता १६०० मीटर लांबीची ३५ हजार किमतीची विजेची तार इलेक्ट्रिक पोलवरून कट करून अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे लक्षात आले. त्यामुळे कनिष्ठ अभियंता किशोर सुर्वे यांनी मारवड पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे. कॉ. शरिफखान पठाण हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार