Viral Video: एका तरुणासाठी भर वर्गात दोन तरुणींच्या ग्रुपमध्ये तुफान राडा,एकमेकींचे केस पकडून लाथा- बुक्याची फ्रीस्टाईल हाणामारी. पहा व्हिडिओ.

Spread the love

ViralVideo : कॉलेज लाईफ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस असतात. परीक्षेतील कॉपी, क्लास बंक, मित्र मैत्रिणींसोबतच्या पार्ट्या, तर कधी क्लासमध्ये दुसऱ्या ग्रुपसोबतची भांडणं..
अगदी दुनियादारी सिनेमातील मित्रांसारखे आयुष्य काही जण आपल्या कॉलेज लाइफमध्ये जगतात. कॉलेजच्या दिवसात अनेक तरुण-तरुणींना कोणा कोणावर क्रश होतं. तर काहीवेळा ते एकमेकांच्या प्रेमातही पडतात. पण या प्रेमाच्या नात्यात अनेकदा वाद होतात, नाती बिघडतात. हे वाद अनेकदा इतके टोकाला जातात की, हाणीमारीवर येऊन पोहचतात. असाच काहीसा प्रकार आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यात तरुणींच्या दोन ग्रुपमध्ये एका मुलावरूनभांडण होत.

त्यानंतर दोन्ही ग्रुपमधील दोन एकमेकींना केस पकडून झोपडू लागतात. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्कं व्हाल, कारण या दोन तरुणी भर कॉलेजच्या क्लासरुममध्ये सर्वांसमोर तुफान हाणामारी करत आहेत. दोन्ही तरुणी अगदी कुस्तीच्या आखाड्यात असल्याप्रमाणे एकमेकांना धोपटून काढतात. यावेळी दोघींना सोडवण्यासाठी काही तरुणी पुढे येतात पण तोपर्यंत दोघी एकमेकींच्या झिंज्या पकडून चेहऱ्यावर चापट्या मारत खाली कोसळतात. या तरुणींनी एका तरुणासाठी अक्षरश: अख्ख क्लासरुम डोक्यावर घेतला होता. हा व्हिडीओ एमिटी युनिव्हर्सिटीमधील असल्याचा दावा केला जात आहे.

पण तो कोणत्या शहरातील आहे हे अद्याप समोर आलेले नाही.व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॉलेजमधील एका क्लासरुम अनेक मुलं- मुली डेस्कवर बसलेल्या आहेत. तर काहीजण शिक्षकांच्या डेस्कजवळ उभे आहेत. यावेळी मुलींच्या दोन ग्रुप भांडण होते. दोन्ही ग्रुपमधील तरुणी एकमेकींसोबत मोठ्याने भांडतात. अशात एक ग्रुपमधील मुलगी दुसऱ्या ग्रुपमधील मुलीला काहीतरी बोलते, ज्यावरून भांडण वाढते.

आणि दोन्ही ग्रुपमधील दोन मुली केस पकडून एकमेकींना अक्षरश: लाथा- बुक्क्यांनी तुडवतात, दोघी एकमेकींच्या चेहऱ्यावर जोर-जोरात चापट मारत मारतात. काही वेळात हाणीमारी करताना त्या जोरात जमिनीवर कोसळतात आणि आडव्या पडून एकमेकींना मारायला सुरुवात करतात. यावेळी क्लासरुमध्ये उपस्थित मुलं -मुली तमाशा बघत फक्त जोरात ओरडत असतात. यावेळी डेस्कवरून उठून कोणीच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

पाहा हाणामारीचा व्हिडीओ…….

पण काहीवेळाने मारामारी करणाऱ्या मुलींच्या आजूबाजूच्या मुली मधे पडून भांडण थांबवताना दिसत आहे. @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्याला आत्तापर्यंत ५ लाखहून अधिक व्हूज मिळाले आहेत. तर अनेकांनी भन्नाट- भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत म्हटले की, तो मुलगा करोडपती असावा ज्यासाठी या दोघी भांडत आहेत. तर दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटले की, दोन्ही मुली भांडत आहेत आणि तो मुलगा त्यांचे रेकॉर्डिंग करत आहे. यावर एकजण कॅमेरामनला शिवीगाळ करत पुढचा व्हिडिओही दाखवायला हवा होता, असे म्हणत आहे. एकाने सांगितले की, ही मारामारी पाहून तो मुलगा खूप मज्जा घेत असावा.

टीम झुंजार