आयुर्वेदा नुसार पावसाळ्यात या एका प्रकारे प्यायल्यास दूध सुद्धा बनतं औषधं, पोट साफ होतं आणि इम्युनिटी होते तगडी

Spread the love

Ayurvedic milk : पावसाळ्यात दूध पीत असाल तर ते खाली दिलेल्या पद्धतीनेच प्या. पावसाळ्यात होणारे आजार टाळण्यासाठी अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक मसाल्यांचे मिश्रण त्यात घाला. ज्यामुळे शरीराची ताकद वाढते आणि ते इनफेक्शन आणि रोगांशी लढण्यास मदत करते.

यंदाचा पावसाळा भारत देशात एखाद्या नैसर्गिक आपत्ती सारखा कोसळत आहे. एकीकडे मुसळधार पावसाने लोकांच्या अडचणीत वाढ तर केली आहेचपण लोकं मोठ्या प्रमाणावर आजारी देखील पडू लागली आहेत. पावसाळा हा असत ऋतू आहे जो रोग आणि संसर्गाचा हंगाम म्हणून देखील ओळखला जातो आणि थेट आपल्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. पावसाळ्यातही अनेकजण थंड पदार्थ खाण्याचे आणि पिण्याचे शौकीन असतात. पण प्राचीन आयुर्वेद सांगते की, पावसाळ्यात आपण हलके आणि उबदार अन्न खावे कारण या काळात वात दोष सर्वात जास्त असतो.

म्हणूनच जर तुम्ही तुमच्या आहारात उकडलेल्या भाज्या आणि सूपचे सेवन केले तर तुमची कार्य प्रणाली मजबूत राहते. आयुर्वेद तज्ज्ञ Nitika Kohli यांनी सांगितले की, पावसाळ्यातही दुधाचे सेवन करण्यावर भर दिला पाहिजे. कारण हा एक संपूर्ण आहार मानला जातो, त्यामुळे दुध योग्य प्रकारे प्यायल्याने पचन आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पावसात दुधाचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया.

डॉक्टरांनी दुधात पाणी टाकण्याचा दिला सल्ला.

उन्हाळ्यात फ्रीजमधून काढलेले थंड दूध थेट पिण्याची सवय आता पावसाळ्यात मात्र बदलावी लागेल. दूध नेहमी कोमट प्यावे. दुधाची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही त्यात अनेक घरगुती मसाले देखील वापरू शकता. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. निकिता सांगतात की दुधात 1/4 प्रमाणात पाणी मिसळले तर त्याचे औषधी गुणधर्मही वाढतात.

‘पावसाळ्यात दूध कसे प्याव ?

pic for Google

गरम दूध पिण्याचे फायदे

पावसाळ्यात नेहमी गरम दूध प्या. हे पचनास मदत करते, पोषक तत्वांचे शोषण सुधारते आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी मदत करते.

दूध कसे उकळावे?

Pic for Google

एक चतुर्थांश पाणी घालून दूध उकळल्यास त्यातून दुधाला शक्ती आणि पोषण प्राप्त होते आणि असे दुध अनेक विकार दूर करण्याचे काम करते.

‘मसालेदार दूध कसे बनवावे?

pic for Google

दुधात वेलची, दालचिनी, हळद आणि आले यांसारखे आयुर्वेदिक मसाले घालून तुम्ही त्याचे पाचक गुणधर्म वाढवू शकता. हे मसाले केवळ चवच वाढवत नाहीत तर अतिरिक्त आरोग्य फायदे देखील देतात. हे प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि पावसामुळे होणाऱ्या अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.

दूध पिण्याची योग्य वेळ

Google pic for

दुधाची पूर्ण शक्ती मिळविण्यासाठी, ते नाश्त्यात प्या. याशिवाय, तुम्ही ते फक्त मील म्हणूनही घेऊ शकता, ज्यामध्ये दुधासोबत इतर कोणतीही गोष्ट खाऊ नये. यामुळे, तुमची शारीरिक प्रणाली दूध सहज पचण्यास सक्षम होईल आणि तुमच्या शरीराला त्याचे सर्व फायदे मिळू शकतील.

पावसाळ्यात दूध कधी आणि कोणत्या पद्धतीने प्यावे?

Pic for Google

पावसात कोणत्या प्रकारचे दूध पिऊ नये?

  • न उकळलेले दूध

  • मीठ घातलेले दूध

  • कॉर्न फ्लेक्स किंवा सीरियल मिसळून बनवलेले दूध

  • फळे घातलेले दूध

जंत दूर करण्यासाठी काय करावे?

Pic for Google

पावसाळ्यात पोटात जंत देखील होतात, त्यामुळे सुंठ, हिंग, लसूण इत्यादी खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्या लोकांचे आतडे खराब आहेत त्यांनी ही रेसिपी नक्की करून पाहावी.

  • टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हे वाचलंत का

टीम झुंजार