Viral Video:भ्रष्ट तलाठ्याच्या अजब कारनामा! लाच घेताना पकडताच तोंडात कोंबल्या नोटा अन् लागला चावू,बघता बघता नोटा टाकल्या गिळून.

Spread the love

Viral Video: लोकायुक्तांना पाहताच तलाठ्यानं ५ हजार रुपये तोंडात टाकले. ही रक्कम त्यानं लाच म्हणून घेतली होती. अधिकाऱ्यांना पाहताच त्यानं ५०० च्या १० नोटा तोंडात टाकत चावण्यास सुरुवात केली. भोपाळ: मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तलाठ्यानं लाच म्हणून पैसे घेतले. तितक्यात त्याला लोकायुक्तांच्या पथकानं रंगेहात पकडलं. लोकायुक्तांना पाहताच तलाठ्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यानं स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला.

याच प्रयत्नात त्यानं हातातल्या नोटा तोंडात कोंबल्या. बघता बघता त्यानं नोटा गिळल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.कटनीतील बिलहरी हल्कामध्ये कार्यरत असलेल्या तलाठी गजेंद्र सिंहनं एका प्रकरणात चंदन सिंह लोधी नावाच्या व्यक्तीकडून ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. चंदन सिंह लोधी यांनी याची तक्रार लोकायुक्त जबलपूर यांच्याकडे केली. त्यानंतर लोकायुक्तांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी तलाठ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं. लोकायुक्तांचा पाहताच गजेंद्र सिंहनं लाच म्हणून मिळालेल्या

५००-५०० च्या १० नोटा तोंडात टाकल्या.लोकायुक्तांसोबत असलेल्या ७ सदस्यांच्या पथकानं नोटा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नोटा काही बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे तलाठ्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मोठ्या मुश्किलीनं गजेंद्र सिंहनं चावलेल्या नोटा बाहेर काढण्यात आल्या. घटना पाहणारे अनेक जण चकित झाले.चंदन लोधी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तलाठ्याविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती लोकायुक्त पथकाचं नेतृत्त्व करत असलेल्या कमल सिंह उईके यांनी दिली. गजेंद्र सिंहला ५ हजारांची लाच घेताना पकडलं. मात्र पथकाला पाहताच त्यानं नोटा तोंडात टाकल्या. पथकाकडे व्हॉईस रेकॉर्डिंगसह अन्य पुरावे आहेत. त्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं उईके यांनी सांगितलं.

खूप प्रयत्न करूनही तोंडातून नोटा बाहेर काढल्या नाहीत… घटनेतील अधिकाऱ्याने लाचेच्या सुमारे ९ नोटा तोंडात ठेवून चघळल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय खूप प्रयत्न करूनही त्याने तोंडातून नोटा बाहेर काढल्या नाहीत. यानंतर लोकायुक्तांचे पथक त्याला रुग्णालयात घेऊन गेले. हॉस्पिटलमध्येही पटवारी तोंडातून पैसे काढायला तयार नव्हता. मात्र खूप प्रयत्न केल्यानंतर त्याच्या तोंडातील नोटा बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अधिकारी नोटा चघळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याला लोकायुक्तांच्या पथकाने अटक केली असून त्याच्या विरिधात पुरेसे पुरावे असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार