Benefits Of Having 1 Teaspoon Of Ghee In The Morning तूप आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, वजन वाढण्याच्या भीतीने तूप खाणं टाळू नका.
‘खा तूप येईल रूप’ ही म्हण तर आपण ऐकलीच असेल. तूप फक्त सौंदर्य वाढवत नसून, आरोग्याच्या दृष्टीने देखील अनेक फायदे देते. त्यातील ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ए मुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. रिफाइंड तेलाऐवजी तुपाचा वापर आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. बहुतांश लोकं चपाती, भात, खिचडी किंवा डाळीवरून तूप घालून खातात. तर काही लोकं सकाळी एक चमचा तूप रिकाम्या पोटी खातात. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने आरोग्याला खरंच फायदा होतो का?
पोषणतज्ज्ञ अवंती देशपांडे यांच्या मते, ‘तूप शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत करते. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप खावे. आयुर्वेदानुसार, तूप हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टचे अम्लीय पीएच कमी करते, यासह लहान आतड्याचे कार्य सुधारते’
आतड्याचे कार्य सुधारते.

खराब आहार, तणाव, झोपेचा अभाव, बैठी जीवनशैली, या कारणांचा थेट प्रभाव आतड्यांवर पडतो. जर आपण देखील या समस्यांपासून जात असाल तर, तूप खा. नियमित रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने आतड्याचे कार्य सुधारते.
पचनसंस्था स्वच्छ करते

रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी आणि मजबूत होते. यासह बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या समस्या टाळण्यास मदत होते.
चेहऱ्यावर येते चमक.

तूप खाईल त्याला रूप येईल, असं म्हणतात ते खोटं नाही. जर आपल्याला नैसर्गिक ग्लो हवा असेल तर, सकाळी तूप खा. नियमित तूप खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि इतर समस्या दूर होतात.
बद्धकोष्ठतेपासून आराम.

ज्यांना आतड्यांसंबंधित त्रास आहे, त्यांनी नियमित तूप खावे. यासह ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी देखील सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खावे. यामुळे पचन तर सुधारतेच, व पोट देखील साफ होते.
वजन कमी करण्यास मदत

तूप दीर्घकाळ भूक नियंत्रित ठेवते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे वजन आटोक्यात राहते.
रोग प्रतिकारशक्ती वाढते.

तुपामध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के आहेत, यासह अँटीऑक्सिडंट्सने देखील समृद्ध आहे. तूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराचे विविध रोगांपासून सरंक्षण करते.
हे वाचलंत का ?
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.