कायमस्वरूपी नौकरी व्हावी म्हणून पाच लाखासाठी 19 वर्षीय विवाहितेचा छळ. पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल.

Spread the love

एरंडोल:- कायमस्वरूपी नौकरी व्हावी यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेवून ये अशी मागणी करून केवळ सात महिन्यापूर्वी विवाह झालेल्या एकोणावीस वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी विवाहितेचा पती,सासू,सासरे यांचेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी,की येथील केवडीपुरा भागातील रहिवासी दीक्षा शुभम सोनवणे हिचा विवाह १६ डिसेंबर २०२२ रोजी ठाणे येथील शुभम चंद्रकांत सोनवणे यांचेशी झाला होता.विवाहानंतर दीक्षा सोनवणे ह्या सासरी गेल्यानंतर पतीसह सासरच्या लोकांनी केवळ दहा ते पंधरा दिवस चांगली वागणूक दिली.त्यानंतर दीक्षाचे पती,सासू आणि दीर किरकोळ कारणावरून दिक्षाशी वाद घालून तिला शिवीगाळ करून मारहाण करू लागले.दीक्षाचे पती शुभम सोनवणे यांनी मला नौकरीवर कायम करण्यासाठी पाच लाख रुपये लागणार असून तू
माहेराहून पैसे घेवून ये अशी मागणी करून तिला मारहाण करू लागले.

२८ डिसेंबर रोजी दीक्षाचे वडील प्रकाश शिंदे हे ठाणे येथे आले असता पतीसह सासरच्या व्यक्तींनी त्यांचेकडे पाच लाख रुपयांची मागणी केली असता त्यांनी पंधा दिवसांपूर्वीच तुमच्या विवाहासाठी खर्च केल्यामुळे माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले.२९ डिसेंबर रोजी दीक्षाचे वडील निघून गेल्यानंतर तिची सासू वर्षा चंद्रकांत सोनवणे,नणंद धनश्री यांनी तिला तुझ्या वडिलांनी पैसे दिले नाहीत असे सांगून मारहाण केली.३० जानेवारी २३ रोजी पती शुभम सोनवणे यांनी दिक्षास मारहाण करून तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करून तीस घराबाहेर हाकलून दिले.त्यानंतर सासरच्या
लोकांनी दीक्षाच्या वडिलांना फोन करून तिला घेवून जाण्याचे सांगितले.

दीक्षाच्या वडिलांनी तिला एरंडोल येथे आणले.११ मार्च रोजी वाढदिवसाचे निमित्त सांगून सासू वर्षा सोनवणे यांनी दीक्षाला ठाणे येथे बोलावून घेतले व चांगले वागवण्याची हमी दिली,मात्र चार ते पाच दिवसानंतर दीक्षाचे पती आजारी असल्यामुळे दवाखान्यात दाखल होते त्यादिवशी तिला मारहाण करून रात्रभर घराबाहेर काढले.याबाबत दीक्षा सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शुभम सोनवणे,सासू वर्षा सोनवणे,नणंद धनश्री रोषण खरे,मामेसासरे पावन एकनाथ पडवळ,दीर सुजल चंद्रकांत सोनवणे, आजलसासू पद्माबाई एकनाथ पडवळ यांचेविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार विकास पाटील तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार