दुकानावर वडीलांना छञी देण्यासाठी आलेली ८ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता,तिसऱ्या दिवशी तिच्या संशयास्पद मृतदेह चाऱ्याखाली आढळला.

Spread the love

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील धक्कादायक घटना.
भडगाव l प्रतिनिधी :— तालुक्यातील गोंडगाव येथुन ८ वर्षीय बेपत्ता मुलीचा संशयास्पद मृतदेह आज दी. १ आगस्ट रोजी मुलीच्या गल्लीतील गोठ्यातील मक्का कुट्टीच्या ढिगाऱ्यात मयत अवस्थेत मिळून आल्याने या दुर्घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील गोंडगाव येथील मुलगी कल्याणी संजय पाटील वय ७ वर्ष ९ महिने या मुलीचे कोणीतरी अज्ञात कारणास्तव पळवुन नेल्या बाबत मुलीचे वडील संजय नारायण पाटील रा. गोंडगाव ता. भडगाव यांनी भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्व नातलग व पोलिसांनी मुलीची सर्वञ शोधाशोध सुरू केली. ही घटना दि. ३० रोजी रविवारी दुपारी २ वाजेच्या ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांचे राहते घराजवळ ही घटना घडली होती. आज दि. १ रोजी तिसऱ्या दिवशी या बेपत्ता मुलीचा मृतदेह गल्लीतील गोठ्या जवळील कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्या खाली दबलेल्या अवस्थेत ४ वाजेच्या सुमारास आढळून आला. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घाव घेऊन मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणला. वैदयकीय अधिकारी डॉ. राहुल नेतकर यांनी मृतदेह पाहणी केली. रात्री ८ .३० वाजेच्या सुमारास हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे नेण्यात आला.

दरम्यान गोंडगाव गावी घटनास्थळी आमदार किशोर पाटील , अप्पर पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे , पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, हरिष परदेशी, जळगाव फॉरेन्सिक लॅबचे पथक व पोलीस कर्मचारी स्वप्नील चव्हाण आदी पोलीस कर्मचारी नी भेट दिली.
मुलीच्या चप्पल हून लागला मृतदेहाचा सुगावा —३ दिवसांपासून मुलीची शोधाशोध सुरू होती. मात्र ती मिळून आली नाही. पोलिसांचे तपास चक्र सुरू होते. मात्र गावातील काही ग्रामस्थांना मक्का कुट्टी असलेल्या खळ्या जवळून मुलीची चप्पल सापडली. तिची चप्पल ची ओळख पटल्याने मका कुट्टी जवळ शोध सुरू झाला. येथुन दुर्गंधीचा वास येत असल्याने अंती पोलिसांना मुलीचा दबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

चौकट….
मुलीच्या वडीलांनी गावातच कालव्याजवळ छोटेसे दुकान टाकलेले आहे. ही मुलगी आपल्या मोठया भावासह दुकानावर वडीलांना छञी देण्यासाठी आलेली होती. मोठा भाऊ पुढे चालत होता ही मुलगी मागे मागे खेळत चाललेली होती. माञ कालव्याजवळील पुलाजवळुन आपल्या घराकडे जातांना क्षणार्धात ही मुलगी गायब झालेली होती. भावाला बहिण न दिसल्यामुळे शोधाशोध सुरु झाली. कल्याणी पाटील हया मुलीचा परीवारासह ग्रामस्थांनी सर्वञ शोध घेतला . माञ ३ दिवस उल्टुन अखेर मृत देह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत. मुलीच्या पच्छात आई वडील, भाऊ असा परिवार आहे.
कल्याणी पाटील ही मुलगी गोंडगाव येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. माञ या घटनेच्या दिवशी रविवार असल्याने शाळेलाही सुटी होती.या घटनेची चौकशीची मागणी नातेवाईक मंडळींसह ग्रामस्थांमार्फत करण्यात येत आहे. गोडगावी घटनास्थळी व भडगाव ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक मंडळींसह ग्रामस्थांची मोठी गर्दी दिसुन आली.
फोटो — कल्याणी पाटील. गोंडगाव. ता. भडगाव.

टीम झुंजार