भडगांव l प्रतिनिधी:- तालुक्यातील गोंडगांव येथील ८ वर्षीय बालिकेचे अपहरण करुन संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आज दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान गोंडगांव येथील बालिकेच्य आई सह महिला ग्रामस्थ यांनी भडगांव पोलिस स्टेशन समोर बालहत्याचा न्याय पाहिजे आरोपींना तात्काळ अटक करा या मागणी साठी गोंडगांव येथील बालिकेच्या आईसह ग्रामस्थांनी आक्रोश करीत ठिय्या आंदोलन केले.
याबाबत सविस्तर असे की गोंडगाव ता.भडगाव येथील कल्याणी संजय पाटील हि आठ वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची घटना दि.३० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान घडली होती याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीसा मार्फेत तिचा शोध घेण्यात आला या बालिकेचा तपास सुरू असतानाच सदर बालिका दि.१ ऑगस्ट रोजी गावातील गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात मृत अवस्थेत मिळुन आली
या घटनेबाबत खुनाचा गुन्हा दाखल करा व सशंयित आरोपींचा शोध घेवुन आरोपींना तात्काळ अटक करा, बालहत्याचा न्याय द्या, या मागणी साठी गोंडगांव येथील बालिकेच्या आईसह २५० ते ३०० ग्रामस्थांनी आक्रोश करीत ठिय्या आंदोलन केले.
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे,सहाय्यक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि.किसनराव नजन पाटील, पाचोरा पो.नि.राहुल खताळ, चाळीसगांव वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक तुषार देवरे, भडगांव पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील,सहाय्यक पोलिस निरिक्षक चंद्रसेन पालकर,पोलिस उपनिरिक्षक शेखर डोमाळे भडगांव पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या सह चाळीसगांव उपविभागातले ३ अधिकाऱ्यां सह २५ कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला
प्रतिक्रिया
अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांनी तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक त्या सर्व गोष्टी आम्ही करीत आहोत निष्पाप लोंकाना अटक केल्या पेक्षा जो खरा आरोपी आहे त्यांना आम्ही अटक करु,चौकशी आमची चालु आहे.या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- ViralVideo:पतीने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत भररस्त्यात रंगेहात पकडले, पतीला आला संताप, पुढे काय झालं पहा व्हिडिओ.
- मुख्याध्यापिकेला रग्गड पगार तरीपण पैशांचा मोह आवरेना; प्रसूती रजा मंजुरीसाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.
- अमळनेर तालुक्यात ३२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा.
- पंचायत समिती कडुन नागरीकांना होणाऱ्या गैरसोयी तातडीने थांबवा – आमदार मा.अमोलदादा पाटील
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.